Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)

मोताळा येथे  महायुतीचे उमेदवार संजय गायकवाड यांच्या प्रचारार्थ शिवसेनेचा भगवा झंजावत…!

महायुतीचे उमेदवार संजय गायकवाड  यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य निष्ठावंतांचा प्रचार रॅलीमध्ये उस्फुर्त सहभाग...! 

Spread the love

मोताळा शहरातून तसेच तालुक्यातून भरघोस मताने लीड देऊन मोठ्या मताधिक्याने विधानसभेत पाठवणार असा माता-भगिनींचा, समर्थकांचा निर्धार….!

बुलढाणा-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:– विधानसभा मतदारसंघातील मोताळा शहरांमध्ये शिवसेना,भाजपा,राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार  संजय गायकवाड यांच्या प्रचारार्थ हजारो जनसमर्थकांच्या तसेच माता-भगिनींच्या साक्षीने भव्य प्रचार रॅली संपन्न झाली,माता-भगिनींनी ठीक-ठिकाणी औक्षण करून उमेदवार संजय गायकवाड यांचे जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टीमध्ये स्वागत केले.

यावेळी महायुतीचे उमेदवार संजय  गायकवाड यांनी सर्व माता-भगिनींचे तसेच उपस्थित जनतेचे हृदय अंतकरणाने आभार मानले तसेच येणाऱ्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी धनुष्यबाणाचे बटन दाबून पुन्हा एकदा विधानसभेमध्ये पाठवून मतदारसंघाच्या अविरत विकासासाठी,गोरगरिबांच्या सेवेसाठी, बेरोजगारांच्या न्याय हक्कासाठी संधी उपलब्ध करून देऊन आशीर्वादरूपी साथ द्यावी असे सांगितले.

यावेळी त्या ठिकाणी शिवसेना,भाजपा,राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी शिवसैनिक माता-भगिनी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page