Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)

जयश्री शेळकेंच्या ‘रोडशो’ने दणाणले बुलढाणा शहर!खासदार मुकुल वासनिकांसह हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग

परिवर्तन अटळ ,जयश्रीताईंचा विजय निश्चित - धुरपतराव सावळे

Spread the love

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तथा महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री सुनिल शेळके यांच्या प्रचारार्थ जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरात आज रोड शो करण्यात आला. यावेळी जिल्हा काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा खासदार मुकुल वासनिक यांची प्रमुख उपस्थिती होती. आज रविवारी, 17 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता बुलढाणा चिखली राज्यमार्गावरील बुलढाणा वासीयांचे आराध्यदैवत असलेल्या मोठी देवी येथून या रोडशो ला प्रारंभ झाला. या प्रचार रॅली मध्ये काँग्रेसच्या पंचायत राज समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, माजी आमदार तथा ज्येष्ठ नेते धृपदराव सावळे, विधान परिषदेचे आमदार धीरज लिंगाडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत , तालुका प्रमुख लखन गाडेकर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड,अडव्होकेट विजय सावळे, तुळशीराम नाईक, विजय अंभोरे, संतोष आंबेकर यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना उबाठा गटाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. यातही युवकांची लक्षणीय उपस्थिती होती. बुलढाणा मतदार संघात परिवर्तन अटळ आहे.जयश्री ताईंचा विजय निश्चित असल्याचे ध्रुपतराव सावळे आयोजित सभेत म्हणाले.

 

मोठ्या देवीचे आशिर्वाद घेऊन निघालेली ही प्रचंड सुंदरखेड कडे निघाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मल्ल्याअर्पण करून रॅली परत निघाली. त्या ठिकाणी पोहोचल्यावर ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक ,महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री शेळके यांनी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर आणि अन्य महा मानवांच्या पुतळ्यांना पुष्पहार हार अर्पण करून मानवंदना दिली. सुंदरखेड मधून जोशात निघालेली ही प्रचार रॅली सर्क्युलर रोड वरून पुढे मार्गस्थ झाली.यावेळी देण्यात आलेल्या गगनभेदी घोषणांनी परिसरासह बुलढाणा शहर दणाणले! सर्क्युलर मार्गावरून ही रॅली चिंचोले चौक परिसरात दाखल झाली. यानंतर शिवनेरी चौक मार्गे बसस्थानक , प्रशासकीय कार्यालय, संगम चौक येथे पोहोचली. या ठिकाणी कार्यकर्त्यांनी जोशात फटाके फोडून रॅलीचे स्वागत केले. अजिंठा रोड मार्गे जयस्तंभ चौक परिसरात दाखल झाली.

जयश्री शेळकेंना प्रचंड मतांनी निवडून द्या: धृपदराव सावळे

दरम्यान रोड शो च्या समारोपात गांधी भवन येथे छोटेखानी सभा घेण्यात आली. यावेळी माजी आमदार सावळे यांनी मुख्य मार्गदर्शन केले.ते म्हणाले की।यंदाची लढाई हुकूमशाही विरुद्ध लोकशाही।अशी असून भावी पिढीचे भवितव्य ठरविणारी आहे. यंदाच्या लढतीत परिवर्तन निश्चित असून उच्चशिक्षित जयश्री ताई शेळके यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page