आपेगाव येथे २८ नोव्हेंबरला मोफत होमिओपॅथिक सर्वरोग चिकत्सा शिबिर
_श्री. ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्यानिमित्त श्री. माऊली होमिओपॅथिक हॉस्पिटलचा उपक्रम

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- श्री. संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त माऊली जन्मभूमी श्रीक्षेत्र आपेगाव(ता. पैठण)येथे आयोजित कार्तिक काला यात्रा महोत्सवादरम्यान २८ नोव्हेंबर गुरुवार रोजी सकाळी ११:०० ते ०२:०० वाजेपर्यंत श्री. माऊली होमिओपॅथीक हाॅस्पीटल व रीसर्च सेंटरच्यावतीने मोफत होमिओपॅथीक सर्वरोग चिकित्सा व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रीक्षेत्र आपेगाव येथे दरवर्षी श्री. ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त कार्तिक काला यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावेळी महाराष्ट्राच्या विविध भागातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी दाखल होतात.या भाविकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी श्री.माऊली होमिओपॅथीक हाॅस्पीटल व रीसर्च सेंटरच्यावतीने दरवर्षी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते. यंदा हाॅस्पीटलचे संचालक सुप्रसिद्ध होमिओतज्ञ डाॅ. दुर्गासिंग जाधव व संचालिका सौ. निलिमा जाधव यांच्यासह हाॅस्पीटलच्या पुणे, जळगाव खान्देश ,औरंगाबाद व बुलडाणा येथील शाखेत कार्यरत वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. शिबिरात सर्व जुनाट व असाध्य आजार, किडनी, कॅन्सर,दमा, थाॅयराईड, बीपी, डायबेटिस , ह्रदयरोग, मुलांचे व स्त्रियांचे आजार, त्वचा रोग, भगंदर, फिशर, मुळव्याध आदींसह सर्व आजारांच्या रुग्णांची तपासणी करण्यात येवून त्यांना औषधी देखील मोफत दिली जाणार आहे.शिबिराचे उद्घाटन श्री. ज्ञानेश्वर माऊली जन्मसंस्थानचे अध्यक्ष अध्यात्म विवेकी ज्ञानेश्वर विष्णू महाराज कोल्हापूरकर दादा यांचे हस्ते होणार असून शिबिराचा गरजुंनी लाभ घ्यावा,असे आवाहन संचालक डाॅ. दुर्गासिंग जाधव, संचालिका डाॅ. सौ. निलिमा जाधव यांनी केले आहे.