विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात
ओपन मुस्लिम कोअर कमिटीचे मुख्याध्यापकांना विविध मागण्यांचे निवेदन

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :-शहरातील जोहर नगर येथील उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय बुलढाणा येथे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता ओपन मुस्लिम कोअर कमिटी, बुलढाणाच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापकांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गेल्या काही वर्षांच्या निकालांवर नजर टाकली तर हे स्पष्ट दिसुन येत आहे कि, शाळेचा शैक्षणिक स्तर घसरला आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सातत्याने निकालाची घासरण विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सोमवारी 25 नोव्हेंबर रोजी ओपन मुस्लिम बिरादरीच्या वतीने शाळेच्या मुख्याध्यापकांना निवेदन देण्यात आले. यात शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यात यावे, विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी आधुनिक कॅमेरे बसवावेत, शंभर टक्के मराठी भाषा विषय लागू करण्यात यावा, विद्यार्थ्यांना मैदान खेळांसाठी तयार करावे, इयत्ता 11वी आणि 12वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांच्या नियमित प्रॅक्टिकल घेण्यात यावे, शाळा समिती स्थापन करावी, तक्रार पेटी बसवावी, पिण्याच्या पाण्यासाठी आरओ प्लांटची व्यवस्था करावी, वर्गखोल्यांमध्ये लाईट, पंखे बसविण्यात यावे सोबतच स्वच्छतागृहांची दररोज स्वच्छता करावी आदी विविध मागण्यांसह निवेदने देण्यात आला आहेत. निवेदन देते वेळी ओपन मुस्लिम बिरादरीचे हाजी सैयद बिलाल, इकबाल अहेमद, शेख जावेद, जुबेर खान, सैयद आसिफ, अड.सैयद आरिफ, आदिल भाई, अशरफ भाई, दानिश अजहर, इकबाल टेलर, हाफिज रईस, कारी कलीम खान, मोईनोद्दीन काझी, मुबश्शीर अहेमद, मुजफ्फर खान, अब्दुर्ररहेमान खान, शेख नदीम, नजीर भाई, शेख रहीम, अड.राज शेख, सैयद जुनेद डोंगरे, शेख शोएब, उबैदुल्लाह खान, राजु आरिफ सेठ, रशीद साहेब, शहेजाद नवाब, शेख सलीम, सैयद मुजीब डोंगरे, शफिक खान, मो.नईम शानु, शेख इलयास, जुबैर मोहम्मद खान, कय्युम खान, राशिद लाला, यासीर भाई आदि मान्यवर उपस्थित होते. वरील मागण्या १५ दिवसात पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.