उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच राजश्री शाहू सोशल फाउंडेशन बुलढाणा तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन….
असंख्य रक्तदातांनी केले आपले रक्तदान

बुलढाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तसेच राजर्षी शाहू सोशल फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. पुरेसा रक्तसाठा नसल्यामुळे आवश्यक शस्त्रक्रिया सुद्धा लांबणीवर पडल्या आहेत. जिल्हा रुग्णालयात गोरगरीब रुग्ण उपचार घेतात. खासगी रक्तपेढीतून रक्त घेणे त्यांना झेपत नाही. या रुग्णांसाठी शासकीय रक्तपेढी मोठा आधार आहे. त्यामुळे समाजातील रक्तदात्यांनी शासकीय रक्तपेढीत रक्तदान करण्यासाठी पुढे आले पाहिजे.
जिल्हा रुग्णालयाच्यावतीने जेंव्हा रक्तदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले तेंव्हा राजर्षी शाहू सोशल फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. आपला रक्ताचा एक थेंब रुग्णाचा जीव वाचवू शकतो. त्यामुळे या शिबिरात रक्तदात्यांनी भरभरुन सहभाग नोंदवावा,असे आवाहन संदीप शेळके यांनी केले होते. त्यांच्या या आव्हानाला रक्तदातांनी चांगले प्रतिसाद दिला होता. या रक्तदातामध्ये विशेष व्यक्तीने रक्तदान केले आहे. बाळू भाऊ भराड 48 वर्षीय यांनी 71 वेळा रक्तदान केले आहे. 1999 पासून ते आपले रक्तदान करत आहे यावेळी त्यांनी 71 व्या वेळी आपले रक्तदान केले आहे.यावेळी या ठिकाणी उ.बा.ठा शिवसेना नेते जयश्रीताई शेळके, राजश्री शाहूचे अध्यक्ष संदीप शेळके, शिवसाई परिवाराचे अध्यक्ष डी एस लहाने सर, काँग्रेस नेते सुनील सपकाळ,उ.बा.ठा शिवसेना तालुका अध्यक्ष लखन गाडेकर,उ.बा.ठा शिवसेना नेते आशिष बाबा खरात, गणेश जाधव, डोंगर खंडाळा उपसरपंच श्याम साळवे, पृथ्वीराज राजपूत, वसीम भाई आदी लोक उपस्थित होते.