आपेगाव येथे मोफत होमिओपॅथी आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
कार्तिक काला महोत्सवानिमित्त श्री माऊली होमिओपॅथी हाॅस्पीटलतर्फे आयोजन

बुलढाणा ( आपलं बुलढाणा जिल्हा बातमी) माऊली जन्मभूमी श्रीक्षेत्र आपेगाव (ता. पैठण) येथे श्री. ज्ञानेश्वर महाराज संजीवन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्तिक काला महोत्सवात २८ नोव्हेंबर गुरुवार रोजी येथील श्री. माऊली होमिओपॅथी हाॅस्पीटलच्यावतीने आयोजित मोफत सर्वरोग चिकित्सा व औषधोपचार शिबीराला उत्तम प्रतिसाद मिळाला. एक हजाराहून अधीक रुग्णांनी या शिबीराचा लाभ घेतला.
आपेगाव येथे कार्तिक काला महोत्सावाला संपूर्ण राज्यातून लाखो भाविक उपस्थित राहतात. त्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी या हेतूने दरवर्षी श्री. माऊली होमिओपॅथी हाॅस्पीटलचे संचालक डाॅ. दुर्गासिंग जाधव व डाॅ. सौ. निलीमा जाधव हे आपल्या पुणे , जळगाव, बुलढाणा व छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील शाखेच्या वैद्यकीय तज्ञ व कर्मचार्यांसह मोफत आरोग्य शिबीराचा उपक्रम राबवितात. यंदा श्री. माऊली जन्मभूमी संस्थानचे अध्यक्ष हभप. ज्ञानेश्वर विष्णूमहाराज कोल्हापूरकर दादा मार्गदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री किशोर खोडपे यांनी श्री. ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख उपस्थिती मध्ये मा. राजू नाना भुमरे, मा. माननीय दत्तात्रय गोर्डे, मा. विश्वनाथ दहे ,मा शिवराज भुमरे ,मा आतिश गायकवाड ,मा श्रीनिवास औंधकर, मा आप्पासाहेब गायकवाड ,मा किशोर चौधरी ,मा शहादेव लोहारे , मा आर्किटेक महेश साळुंखे ,मा नागरगोजे (पी. एस. आय) , मा आप्पासाहेब निर्मळ , मा संजय मदने (पी. एस. आय) मा. किशोर खोडपे यांची उपस्थिती होती.
सदर शिबिरात विविध आजारांच्या हजारो रुग्णांची डाॅ. दुर्गासिंग जाधव व त्यांच्या चमूने मोफत तपासणी करुन त्यांना एकून लाखो रुपयांच्या औषधीचे ही मोफत वाटप केले. यामध्ये किडनी, कॅन्सर, दमा, थाॅयराईड, ह्रदयरोग, मूतखडा ,रक्तदाब व मधुमेह ,सोरायसिस कोड संधीवात , Migraine सर्दी मूळव्याध PCOD व्हेरिकोज व्हेन्स तसेच त्वचारोगासह असाध्य व जुनाट आजारांच्या रुग्णांचीदेखील तपासणी करण्यात आली. तसेच त्यांना आवश्यकतेनुसार पुढील उपचारदेखील सवलतीसह देण्यात येणार असल्याचे डाॅ. जाधव यांनी जाहिर केले. सकाळपासून सुरु झालेल्या शिबीरात दुपारी उशीरापर्यंत रुग्ण तपासणी सुरु होती. डाॅ. दुर्गासिंग जाधव ,डाॅ. सौ. निलीमा जाधव, डाॅ. मंगेश पाटील, डॉ अक्षयकुमार चव्हाण यांच्यासह श्री. माऊली हाॅस्पीटलच्या विविध शाखेत कार्यरत वैद्यकीय तज्ञांनी सदर शिबिरात आपली सेवा दिली.
यशस्वितेसाठी राजु सावंत, प्रेमसिंग मोरे , ज्ञानेश्वर पवार, गणेश पाटील आदींनी परीश्रम घेतले.