व्हाईस ऑफ मीडिया डिजिटल विंगच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी नितीन कानडजे पाटील यांची नियुक्ती..

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- जागतिक पातळीवर ४७ देशात पत्रकारांसाठी काम करणाऱ्या ३ लाख ९० हजार सदस्य संख्या असणाऱ्या या पत्रकाराच्या संघटनेच्या डिजिटल मीडिया विंगच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी नितीन कानडजे पाटील यांची निवड करण्यात आली.. बुलढाणा येथे आयोजित करण्यात आलेल्या पदग्रहण सोहळा येथे आज दि.4 डिसेंबर रोजी व्हाईस ऑफ मीडिया संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के पाटील, बुलढाणा अर्बन चे सर्वेसर्वा तथा राष्ट्रीय सल्लागार राधेश्याम चांडक ऊर्फ भाईजी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन नितीन कानडजे पाटील यांची निवड करण्यात आली. व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.
देशात व राज्यांमध्ये सर्वात जास्त संख्येने मिडियात काम करणाऱ्या पत्रकारितेतील घटक म्हणजे डिजिटल पत्रकार जगाची चक्रे वेगाने फिरवत असताना व सध्या माहिती व ज्ञानाचा सर्वात मोठा स्रोत असताना देखील डिजिटल मीडिया बाबत देशात किंवा राज्यांमध्ये कोणतेही तरतूद नाही, नियमावली नाही, डिजिटलच्या पत्रकारांना कोणतेही मान्यता, मानधन, योजना नाही किंवा भविष्य बाबत नियोजन नाही या सर्व गोष्टी लक्षात घेऊन पत्रकार व पत्रकारिता वाचली पाहिजे या उद्देशाने काम करणाऱ्या देशातील सर्वात मोठी पत्रकार संघटना व्हाईस ऑफ मीडिया डिजिटल मीडिया विंग बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी नितीन कानडजे पाटील यांची निवड केल्याबद्दल नूतन जिल्हाध्यक्ष नितीन कानडजे पाटील यांनी मान्यवरांचे आभार मानले.
यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के पाटील , व्हाट्सअप मीडियाचे राष्ट्रीय सल्लागार तथा बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक उर्फ भाईजी कोर कमिटी सदस्य अरुण जैन, जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत बगाडे, सिद्धार्थ आराख, कार्याध्यक्ष कृष्णा सपकाळ, देशोन्नतीचे राजेंद्र काळे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाईस ऑफ मीडियाचे प्रवक्ते गजानन धांडे तर आभार प्रदर्शन नदीम शेख यांनी केले आहे.यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.