Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)

शेगावात ऑपरेशन मुस्कान यशस्वी !

ग्रामीण पोलिसांनी १३ वर्षीय बालकाला पालकांच्या दिले ताब्यात

Spread the love

शेगाव:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- : ‘ऑपरेशन मुस्कान – 13 ‘ ही राज्यभरातील अल्पवयीन मुले आणि 18 वर्षांवरील महिलांचा शोध घेण्यासाठी राबविण्यात येत आहे. एक प्रभावी उपक्रम म्हणून दरवर्षी पोलीस विभागाकडून ही विशेष मोहिम राबवली जाते. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये शेगाव ग्रामीण पोलिसांनी पुण्यातील एका बालकाचा शेगाव परिसरात शोध लावून त्याच्या पालकांच्या ताब्यात देऊन ‘ऑपरेशन मुस्कान – 13 ‘ यशस्वी केले आहे. बुलडाणा पोलीस अधिक्षक विश्व पानसरे यांचे आदेशान्वये जिल्ह्यात ऑपरेशन मुस्कान-13 हि शोध मोहीम दिनांक ०१ डिसेंबर ते दिनांक ३१ डिसेंबर या कालावधीत राबवणे करीता पोलीस स्टेशन स्तरावर पथक तयार करण्यात आले असून या मोहिमे अंतर्गत 18 वर्षाखालील हरवलेल्या बालकांचा व महिलांचा कसोशीने शोध घेवुन कार्यवाही करण्याबाबत आदेश शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण लिंगाडे यांनी पो. उपनि, गजानन शिंदे, व तीन पोलीस अंमलदार एक महिला अंमलदार असे पोलीस स्टेशन स्तरावर पथक तयार केले आहे. सादर पथक हे शोध मोहीम दरम्याण पेट्रॉलीग करीत असतांना, ग्राम जवळा बसस्थानक येथे प्रसाद शशिकांत सांळुखे वय १३ वर्ष रा. वालेकर हा रडत असतांना मिळून आला. त्यास विचारपुस केली असता त्याने सांगतले तो हा पुणे जिल्ह्यातील वाडी पिंप्री चिंचवड येथील राहणार असून आपण रागाचे भरात पुणे येथुन लक्झरी बसमध्ये शेगांव व तेथून जवळा येथे ऑटोने आलो आहे असे सांगितले.पथकाने त्यास शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला आणुन त्याचेकडुन त्याचे कुटुंबाची माहिती घेतली. त्यांनतर ठाणेदार प्रविण लिंगाडे यांनी सदर मुलाचे वडील शशिकांत नामदेव साळुंखे रा. पुणे यांचा मोबाईल क्रं. प्राप्त करुन त्यावर संपर्क करुन मुला विषयी माहिती देण्यात आली. त्यांनतर पालक शेगावात पोहचल्यावर त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. हि कारवाई पो.अ.सा.विश्व पानसरे, अपर पोलीस अधिक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी खामगांव, विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page