कारंजा चौकात मोठ्या स्क्रीनवर प्रक्षेपण नगर सेवक अरविंद होंडे मित्रमंडळाचा उपक्रम

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- राज्याचे मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर घेतलेल्या शपथविधी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण स्थानिक कारंजा चौकात अरविंद होंडे मित्रमंडळाच्या वतीने मोठ्या स्क्रीनवर करण्यात आले.
प्रारंभी कारंजा चौकात अरविंद होंडे मित्रमंडळाच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करून पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. यावेळी भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे पदाधिकारी यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी भाजपाचे गोकुल शर्मा, ॲड.व्ही.डी.पाटील, ॲड.दिनोदे, विश्राम पवार, नगरसेवक अरविंद होंडे, नगरसेवक मोहन पऱ्हाड, भास्करराव बाहेकर, लालाभाई, बंडू आसाबे, नितीन श्रीवास, सचिन देशलहरा, जगदीश पाठक, वैभव राजपूत, अशोक व्यास, अशोक शर्मा, महाजन, शाम शर्मा, गोपाल कांबळे, निखिल शर्मा, भगवान एकडे, विश्वनाथ घोडके, शरद एकडे, लक्ष्मण ठाकरे, निनाजी भगत, संतोष म्हस्के, गजानन पडोळ आदींसह कारंजा चौक दुर्गा उत्सव मित्र मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.