36 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने केला लंपास !

देऊळगाव राजा :-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:अंभोरा चिरबंदी येथील रामेश्र्वर भगवान मगर यांच्या घरातून अज्ञात व्यक्तींनी रोख रक्कम व 4 मोबाईल असा एकूण 36 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना 7 डिसेंबर च्या रात्री घडली.
सविस्तर वृत्त असे की, अंभोरा येथील रहिवासी रामेश्र्वर मगर यांच्या घरातील स्टीलचे डब्यातील नगदी 10.000 रुपये, रेडमी कंपनीचे 02 मोबाइल किंमत अंदाजे 14,000 रुपये असा एकुण 24,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. तसेच आनंदा लाड याचे कामावरील माणसांचे दोन मोबाइल किंमत अंदाजे 12,000 रुपये असा एकुण 36.000 रुपयेचा मुददेमाल कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेला आहे. या प्रकरणी चोरीची तक्रार पोलिस ठाण्यात दिली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल माधव कुटे करीत आहे.