जाफ्राबाद येथे शिवसेना व युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची शाखा स्थापना
नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते पहिल्याच फलकाचे अनावरण

दाभा – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी: संतोष अजगर= हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नेहमीच म्हणायचे गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक तयार करा.याप्रमाणेच लोणार तालुक्यातील जाफ्राबाद येथे शिवसेना व युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची शाखा स्थापन केली असून नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ खरात हे आमदार झाल्यापासून यांच्या हस्ते मेहकर मतदार संघातील पहिल्याच शाखा फलकाचे अनावरण 12 डिसेंबरला करण्यात. आले आहे.
नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ खरात शाखा फलकाचे अनावरण व सदिच्छा भेट देण्यासाठी येणार आहेत म्हणून गावकरी मोठ्या उत्साहाने मोठ्या संख्येने जमले होते. आमदार सिद्धार्थ खरात यांचे गावात आगमन होताच फटाकडे फोडून त्यांचं गावकऱ्यांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखा फलकाचे अनावर झाल्यानंतर गावात त्यांचे औक्षण करण्यात आले. नंतर श्री संत अश्रू बाबा महाराज संस्थांवर जाऊन श्री संत अश्रू बाबा महाराज यांच्या समाधीस्थळी जाऊन आमदार सिद्धार्थ खरात यांनी दर्शन घेतलं.
यावेळी आमदार सिद्धार्थ खरात यांनी कार्यकर्त्या समवेत संस्थांची व संस्थानच्या परिसराची पाहणी केली. नंतर नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ खरात यांचा शिवसेना शाखाप्रमुख पांडुरंग ओव्हर,युवा सेना शाखाप्रमुख स्वप्निल ओव्हर, तसेच संस्थानचे सचिव अशोक पाटील पोफळे व गावकऱ्यांच्या उपस्थित नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ खरात यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या ठिकाणी आमदार सिद्धार्थ खरात यांनी गावकऱ्यांना अगदी मोलाचे मार्गदर्शन केले. की मी नवीन असतांनीच जाफराबाद या गावात आलो होतो माझ्या कोणी आहे गावात ओळखीचे नसताना सुद्धा प्रचार करता एक फेरी मारली होती तरीसुद्धा लोकांनी मला भरभरून प्रेम दिले आणि मतदान सुद्धा केले त्यामुळे जात पात न पाहता मी आपल्या जाफराबाद गावाला भरीव निधी देऊन तसेच ब दर्जा प्राप्त असलेल्या संस्थांच्या विकासाला सुद्धा नक्कीच भरीव निधी सतत मदत करून मी तुमचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करेन. जे तुम्हाला पंधरा वर्षात दिले नाही. त्यापेक्षा जास्त विकास मी करून दाखवणार आहे असे सुद्धा आमदार सिद्धार्थ करा त्यांनी सांगितले. अश्रू बाबा संस्थांची दिंडी ही दरवर्षी जाफराबाद ते शेगाव पावसाळ्यात जात असते दिंडीतील भाविक भक्तांना मी जानेफळ मुक्कामी जाऊन सर्व वारकऱ्यांना पाऊसापासून संरक्षण मिळावं म्हणून रेनकोट वाटप करण्यात आले होते. या भाविकांची अश्रू बाबा महाराज व शेगावचे गजानन महाराजांची कृपा झाली.. त्यांच्या आशीर्वादाने व व जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने मेहकर मतदार संघ आमचा अभेध गड आहे असे म्हणणाऱ्यांना पराभूत करून मी या ठिकाणी आमदार झालो . यावेळी कृषी उत्पन्न कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विजय मोरे, अश्रू बाबा संस्थान चे सचिव अशोक पाटील पोफळे, माजी सरपंच अरविंद हाडे, साहेबराव पाटील हिवाळे युवासेना तालुकाप्रमुख जीवन घायाळ, साहेबराव ओव्हर, दत्तात्रय ओव्हर, शिवसेना शाखाप्रमुख पांडुरंग ओव्हर, युवा सेना शाखाप्रमुख स्वप्निल ओव्हर, शिवसेना सर्कल प्रमुख स्वप्निल हाडे,राजू गायकवाड,डॉ. राजेश मोरे, ब्रह्मानंद मोरे, रामदास अजगर, जाफराबादचे तंटामुक्ती अध्यक्ष परमेश्वर पाटील ओव्हर, संतोष अजगर, प्रदीप डव्हळे,आश्रूबाबा संस्थान चे पुजारी गणेश महाराज ओव्हर, रामदास ओव्हर, अमोल ओव्हर, प्रदीप ओव्हर, निलेश वाघमारे, मुरली ओव्हर, श्रीराम ओव्हर, वैभव ओव्हर, शिवाजी ओव्हर, व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन विजय मोरे सर यांनी केले.