Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)

ईक्लास वन जमीन कसनाऱ्यांच्या नावे करा, अन्यथा पायी लॉगमार्च काढू ….. आम्रपाल भाऊ वाघमारे 

Spread the love

बुलढाणा :-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- अनेक वर्षांपासून शासकीय ईक्लास वन जमीन आम्ही स्वता मेहनत करून आमच्या परीवाराचा चरीतार्थ चालवत असताना बऱ्याच दिवसांपासून कायम भाडेपट्टे करण्याचा निर्णय प्रलंबित असून अजूनही शासन गोरगरीब जनतेकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यांची खंत आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते मा नरहरी दादा गवई यांनी निवेदन देते वेळी व्यक्त केली आहे . असे निवेदन जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे .आम्ही सर्वच गायरान वन जमीन कसनारे शेतकरी हे दारेद्रय रेषेखालील खालील असून सर्वच अनू सुची जाती , व भटक्या विमुक्त जमातीचे असून आम्हाला आमच्या उपजिवेकीचे साधन नसल्यामुळे व सरकारच्या नाकर्ते धोरणामुळे आम्हाला ह्या जमीनीवर कब्जा करावा लागला असून सरकारने जर गोरगरीबांच्या मुलभूत गरजाकडे लक्ष दिले असते तर आमचे आर्थिक शोषन झाले नसते असे मत भारतीय समता संघटनेचे अध्यक्ष मा आम्रपाल भाऊ वाघमारे यांनी व्यक्त केले आहे .शासकडे अनेक वेळा निवेदन आंदोलने करूण सुद्धा सरकारणे आम्हाला आमच्या ताब्यातील असलेल्या जमीनी कायम करण्याच्या ऐवजी उलट शासकीय जमीन कसनाऱ्याला शेतकऱ्यांची जमीन सौर ऊर्जेचा नावाखाली ह्या जमीनी कंपनीच्या घश्यात घालण्याचा कुटूल ठाव येथील सरकार रचत आहे .सरकारणे ताब्यातील वहीती जमीन कसनाऱ्यांच्या नावे करण्याघा निर्णय जर सरकार घेत नसेल तर आम्ही आमच्या परीवारासह मुंबई मंत्रालयावर पायी लॉगमार्च काढू असा सज्जड दम फडणवीस सरकारला निवेदनात देण्यात आला आहे .आमच्या ताब्यातील वहीती असलेल्या जमीनीवर सौर ऊर्जेचा प्रकल्प न घेता तो सरकारने ईतर ठिकाणी घेण्यात यावा असा सल्ला नरहरी दादा गवई यांनी सरकारला दिला आहे .28 सप्टेंबर 1991 च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करून पात्र होणाऱ्या शेतकऱ्याना तात्काळ कायम भाडेपट्टे वाटप करूण 2020 पर्यत ज्याच्या ताब्यात वहीती शेती आहे त्याना सुद्धा कायम भाडेपट्टे वाटप करण्यासाठी शासनाने नव्याने त्वरित निर्णय घ्यावा , व सरकारने भाडेपट्टे वाटपाचा निर्णय तात्काळ न घेतल्यास आम्ही सर्वच गायरान वन जमीन कसनारे शेतरी पायी लॉगमार्च काढू असे सुद्धा निवेदनात सागण्यात आले आहे .या वेळी राम म्हत्रे विठ्ठल गीरी ,शत्रूघ्न शेगोकार , वसूदव निकाळजे , सुखदेव तांयडे ,जानराव भिडे ,मीलींद जाधव ,दिलीप शेजोळ , राजेश भाई बोर्डे , रमेश गवई , नारायणन साबळे , धिरज इंगळे , सुखदेव जाधव पांडूरंग चेव्हान ,भिकाजी बोरकर , इत्यादी हजर होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page