Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)
वारसा हक्काच्या प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांना नियुक्ती मिळण्यासाठी उपोषण..

बुलढाणा:- आपल बुलढाणा जिल्हा बातमी: लाड समितीच्या शिफारशीनुसार सफाईगार पदावर नियुक्ती मिळावी म्हणून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पात्र उमेदवारांनी आज पासून आमरण उपोषण सुरू केले आहे.. बुलढाणा जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील वारसा हक्काच्या प्रतीक्षा यादी मध्ये गेल्या पाच ते सहा वर्षांपासून नियुक्ती दिली आहे.. मात्र जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे मागणी करून सुद्धा कार्यालयाकडून खोटे आश्वासन देण्यात आले आहे..मागे तीन महिन्यापूर्वी देखील आम्ही उपोषण करून सुद्धा खोटे आश्वासन देऊन उपोषण स्थगित केले होते ..त्यामुळे आता जोपर्यंत वारसा हक्काच्या प्रतीक्षा यादीतील नियुक्त पत्र मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नसल्याचे पात्र असलेले उमेदवारांनी सांगितले आहे.