संविधानाचा अवमान केल्याप्रकरणी आंबेडकरी समाजाच्या वतीने निवेदन…

बुलढाणा :-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :परभणी येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे एका विकृत बुद्धीच्या व्यक्तीने तोडफोड केली. या घटनेच्या निषेधार्थ आज दि. 16 डिसेंबर 2024 रोजी बुलढाणा शहरातील समस्त आंबेडकरी जनतेच्या वतीने मा. राज्यपाल महाराष्ट्र राज्यपाल यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये परभणी येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे तोडफोड करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा व देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.विटंबना करणाऱ्याची नार्को टेस्ट करून त्याच्या पाठीशी असलेल्या मास्टरमाईंडचा शोध घेण्यात यावा व त्यांना अटक करावी. सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावे. अनुसूचित जातीच्या व बौद्ध वस्त्यांमध्ये मध्ये चालविलेले कोबिंग ऑपरेशन थांबविण्यात यावे.
असा प्रकार पुन्हा होणार नाही याकरिता सदर आरोपी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून फाशीची शिक्षा देण्यात यावी. आंदोलन कर्त्या निष्पाप तरुणांवर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे. परभणी येथे अटक करण्यात आलेल्या भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला ही अत्यंत वेदनादायी व दुःखद घटना आहे. त्यांचा जामीन अर्ज मंजूर होऊन सुद्धा न्यायालयीन कोचडीतच त्यांचा मृत्यू होणे संशय जनक आहे. सदर मूर्तीची सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावरती कुणाल पैठणकर, निलेश गायकवाड, अमोल खरे, प्रतीक जाधव,विनोद इंगळे, डी.आर.इंगळे,मच्छिंद्र इंगळे,सतीश खोडके,तुषार खरे ,दादासाहेब काटकर, मंगेश इंगळे, मुकेश हिवाळे, आशिष खरात, अनंता मिसाळ, किशोर सुरडकर,आकाश हिवाळे, निलेश राऊत,उमेश हेलोडे,लखन गाडेकर, धम्मरत्न गवई, मल्हारी गवई, दामोदर बिडवे, प्रशांत जाधव,विजय ससाने, गजानन अंभोरे,गौरव अंभोरे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.