आरोग्य सेवा सुलभ आणि सक्षम बनविण्याच्या दृष्टिकोनातून उपाय योजना करा…!
केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिल्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना ...!

बुलढाणा ( आपलं बुलढाणा जिल्हा बातमी )गोरगरीब जनतेला केंद्रबिंदू माणुन प्रत्येक व्यक्तीला उत्तमातील उत्तम आरोग्य सेवा मिळावी यादृष्टीकोनातून आरोग्य सेवा सुलभ आणि सक्षम बनविण्यासाठी उपाय योजना करण्याच्या सूचना केंद्रीय आयुष (स्वंतत्र प्रभार ) आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिल्यात.
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अर्थसंकल्पासंदर्भात 18 डिसेंबर रोजी दिल्ली येथील आरोग्य मंत्रालयाच्या दालनात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली . या बैठकीला आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते ते पुढे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील प्रत्येक नागरिकांना उत्तमातील उत्तम आरोग्यसेवा देण्यासाठी आपलं सरकार कटिबद्ध आहे त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या अर्थसंकल्पात आरोग्यसेवा अधिक सक्षम करून नागरिकांना सहज आरोग्य सुविधा मिळण्याच्या दृष्टिकोनातून उपाय योजना करा अशी सुचना केली सोबत आरोग्य विषय विविध विषयावर चर्चा करण्यात आली या बैठकीला आरोग्य विभागाची वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.