उर्दू हायस्कूल जूनियर कॉलेज बुलढाणा येथे भव्य विज्ञान प्रदर्शनी…
विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रोजेक्ट विज्ञान प्रदर्शनी मध्ये मांडले

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- हे युग आता तंत्रज्ञान विज्ञानाचा झालेले आहे. विज्ञानामुळे जगातला कानाकोपऱ्यातला माहिती आता तंतोतंत मिळते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आज दि 19 डिसेंबर रोजी उर्दू हायस्कूल ज्युनिअर कॉलेज बुलढाणा येथे भव्य विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनी मध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी आपापल्या पद्धतीने आपले प्रोजेक्ट तयार केले आणि ते या विज्ञान प्रदर्शनी मध्ये सर्वांसमोर मांडले आहे. या विज्ञान प्रदर्शनी मध्ये वर्ग 5 वी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे.
या विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन शाळेचे अध्यक्ष मुख्याध्यापक अ रहीम सेठ यांच्या हस्ते करण्यात आले आहे. शाळेचे मुख्याध्यापक यांनी आपल्या भाषणांमध्ये विज्ञानाचे महत्त्व काय असते याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. या कार्यक्रमाचे संचालक दाऊद सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री जाकीर सर यांनी केले आहे.
यावेळी उर्दू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अ रहीम सेठ, सचिव सय्यद यासीन, सदस्य जाकिरिया सेठ,अ हमीद सेठ,मो सामीर सेठ, उपमुख्याध्यापक दाऊद सर, पर्यवेक्षक यासीर सर, शिक्षक व कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने या विज्ञान प्रदर्शनीला उपस्थित होते.