सहकार विद्या मंदिर, कला व वाणिज्य महाविद्यालय डोंगर खंडाळा येथे वार्षिक स्नेहसंमेलन अंतरंग”मोठ्या उत्साहात साजरे

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- स्थानिक स्व. बसंतीबाई देवकीदासजी चांडक सहकार विद्या मंदिर, डोंगर खंडाळा येथे वार्षिक स्नेहसंमेलन अंतरंग 2024 -25 चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष बुलडाणा अर्बन चे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुकेशजी झंवर साहेब , प्रमुख पाहुणे म्हणून बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद माळी सर व त्याचे सहकारी, गावच्या सरपंच प्रज्ञाताई कांबळे, स्थानिक संचालक मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणातून डॉ. सुकेशजी झंवर यांनी बुलढाणा अर्बन परिवार समाजाच्या विकासाच्या दृष्टीने कसा कार्यरत आहे यावर प्रकाश टाकला तसेच मुलांच्या विकासासाठी, समाजाच्या विकासासाठी बुलढाणा अर्बन यांच्यामार्फत सुरू असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे भगवत गीतेचे महत्व व त्याची असलेली गरज ज्यातून आपण सर्व आपली भारतीय संकृतिचे जतन करून देशासाठी आदर्श नागरी होऊ. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शरद माळी यांनी यश मिळवायचे असेल तर अथक परिश्रम गरजेचे असतात. मुख्याध्यापक सतीश रोढे यांनी कार्यक्रमाची प्रस्थावनेमध्ये भाईजी याचे शिक्षण व त्यातून आपल्या समाजाची प्रगती ही संकल्पना मांडली तसेच शाळेकडून विद्याथ्याचा सर्वांगीण विकास कसा सुरु आहे. 19आणि 20 डिसेंबर या दोन दिवसात पार पडलेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या वेगवेगळ्या कलागुणांचे उत्कृष्ट प्रदर्शन गेले. त्यामध्ये मोबाईल वापराचे विद्यार्थ्यांवर होणारे परिणाम, हुंडा प्रथा , शेतकऱ्यांची व्यथा, विज्ञानाचे महत्व, अंधश्रद्धा निर्मुलन, पाण्याचे महत्व, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहास, थोर पूर्षांचे महत्व, अशा वेगवेगळ्या मुद्यांवर प्रकाश टाकण्याचा पायत्न विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला. 19 डिसेंबर ला सूत्रसंचलन नितीन घुले, अर्ती सावळे, केतन गीते, पूजा देशमुख, आदींनी केले तचेच 20 डिसेंबरला गायत्री पालीवाल व रिटा काटकर यांची सूत्रसंचलन केले.
कार्यक्रमाच्या यश्वितेसाठी अध्यक्ष कोमल मॅडम यांचे मार्गदर्शन ,शाळेचे सर्व शिक्षकांचे अथक परिश्रम, शिषेकेतर कर्मचारी, विद्यार्थी व इतरांनी अथक परिश्रम घेतले.