आस्मानी संकटाने दिल्या शेतकऱ्या च्या हातावर तुरी….
अपरिचित व्हायरसमुळे हजारो हेक्टर तुरीचे नुकसान

मलकापुर – घिर्णी :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:-रवींद्र गव्हाणे:- शेतकरी म्हटले की समस्या आल्यास मग ते शेती तयार केल्यापासून ते बियाणे पेरिपर्यंत आणि बियाणे पेरल्यापासून ते सोंगणी बांधणी पर्यंत त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो कधी त्याला बोगस बियाणे मिळते तर कधी महागडे खत म्हणून त्याच्या मस्तकी माती मारल्या जाते अशातच तो आता अनेक दिवसापासून आसमानी संकटाचा सामना करत आहे सुरुवातीला मध्यम स्वरूपाच्या पाऊस पडल्यामुळे शेतकरी सुखी होता व त्याच्या शेतामध्ये पीक सुद्धा जोमात होते परंतु निसर्ग कोपला व शेतकऱ्याच्या शेतात बोलणाऱ्या पिकाकडे जणू काही जोरजोराने आक्रोश करू पाऊस पडूलागला त्यामुळे शेतकऱ्याच्या शेतात असणारी सोयाबीन, उडीद, मुग, मका, ज्वारी हे प्रमुख पिके जमीनदोस्त झाली व शेतकऱ्याला खूप मोठा आर्थिक फटका बसला त्यातून तोच कसाबसा सावरला आणि पुन्हा जिद्दीने उभा राहिला आणि शेतात राहिलेल्या तुर पिकाला योग्य मशागत करून पुन्हा उभे केले पंधरा दिवसा अगोदर त्याला असं वाटत होतं की यंदा सरकार सुद्धा तुरीला चांगला भाव देईल व तुरीचे उत्पन्न पण वाढेल परंतु सगळं होत्याच नव्हतं झाला आणि पुन्हा शेतकऱ्याच्या शेतामध्ये नवीन व्हायरसने थैमान घालून ज्यामुळे तुरीच्या पिकाला चांगलाच फटका बसला जास्त फुलं व शेंगा पडलेल्या असतानाच पूर्ण झाड अचानक वाळू फुलांची गड सुरु झाली लागल्यामुळे शेतकरी चांगला चिंतेत सापडला मलकापूर तालुक्यातील घिर्णी , माखणेर उमाळी बेलाड, वरखेड. तसेच संपूर्ण तालुक्यातील अनेक गावातील शेतकरी अपरिचित व्हायरसने घाबरलेल्या शेतकऱ्याला अचानक आलेला हा व्हायरस शेतकऱ्याचे भलं मोठं नुकसान करून गेला आपल्या शेतात चांगली तूर पाहून शेतकरी समाधानी झाला होता परंतु अचानक आलेल्या व्हायरसने त्याला पुन्हा चिंतेत लोटले कृषी क्षेत्रात जाणकार व्यक्तींनी सुद्धा शेतकऱ्याकडे यावेळेस पाठ फिरवली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यावर फक्त आणि फक्त पश्चातापाची वेळ निर्माण झाली आहे .