श्री स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेचे कॅलेंडर डॉक्टरांच्या हस्ते विमोचन….
अध्यात्मिक वातावरणामध्ये चालते बँकेचे कामकाज....

बुलढाणा:- आपला बुलढाणा जिल्हा बातमी:- बुलढाणा शहरामध्ये अनेक पतसंस्था आहे मात्र यामध्ये एक नाव येते ते म्हणजे श्री स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्था बुलढाणा यांचे कारण ही तसेच आहे.
आज 26 डिसेंबर रोजी श्री स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने एक कॅलेंडर काढण्यात आले त्याचा विमोचन सोहळा हा डॉक्टरांच्या हस्ते करण्यात आला. या सोहळ्यामध्ये बुलढाणा शहरातील नामांकित डॉक्टर उपस्थित होते. डॉक्टरांनी सुद्धा या अध्यात्मिक वातावरणामध्ये येऊन आपल्या प्रतिक्रिया या प्रसारमाध्यमासमोर मांडल्या आहे.
याव्यतिरिक्त या बँकेमध्ये सकाळपासूनच आध्यात्मिक वातावरणाची सुरुवात होते ते म्हणजे सकाळी या बँकेमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज यांची आरती करण्यात येते त्यानंतर कामकाजाला सुरुवात करण्यात येते. या अगोदर सुद्धा बँकेच्या वतीने 3 वेळा कॅलेंडर काढण्यात आले आहे.
बँकेच्या वतीने अनेक विविध उपक्रम राबविल्या जातात त्यामधला एक अनोखा उपक्रम म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा अर्थातच बँकेमध्ये नवदम्पत्याच्या हस्ते श्री स्वामी समर्थ महाराज यांची पूजा करून आरती करण्यात येते.
तसेच एक दिवशीय गुरुचरित्र पारायण सोहळा साठी बुलढाणा येथून 50 सेवेकरी बँकेच्या वतीने निशुल्क त्र्यंबकेश्वर येथे घेऊन जाण्यात येते. त्या ठिकाणी त्यांच्याकडून पारायण करून घेण्यात येते. या पारायण यामुळे त्यांच्या घरातील तसेच आर्थिक सर्व समस्या दूर होतात असे सेवेकरी यांचे म्हणणे आहे. बँकेच्या वतीने हा अनोखा उपक्रम घेण्यात येतो. जुलैपासून हा उपक्रम बँकेच्या वतीने राबविण्यात येतो आतापर्यंत बँकेच्या वतीने 250 सेवेकरी घेण्यात आले आहे. अशी माहिती श्री स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष गजानन राऊत यांनी दिली आहे.
यावेळी डॉ. गोपाल उबरहंडे, डॉ दीपक बढे, डॉ अंशुमान जयस्वाल, डॉ दिपाली अंशुमान जयस्वाल, बँकेचे अध्यक्ष गजानन राऊत, बँकेचे कार्यकारी संचालक दादाराव मोरे, तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होते.