मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्षपद जिल्ह्याकडेच कायम!
चंद्रकांत बर्दे यांची परिषदेकडून राज्य उपाध्यक्षपदी झाली नियुक्ती !

बुलढाणा:’ आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:-८५ वर्षाचा इतिहास असणार्या मराठी पत्रकार परिषद, ही पत्रकारांची मातृसंस्था.. गत ३ टर्म म्हणजेच ६ वर्षापासून या संघटनेचे राज्य उपाध्यक्षपदी दै.देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र काळे हे होते. त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर आता हे पद पुन्हा बुलढाणा जिल्ह्याकडे कायम राहिले असून, या पदावर परिषदेने चंद्रकांत बर्दे यांची अमरावती विभागातून नियुक्ती केली आहे.
मराठी पत्रकार परिषदेच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाच्या नियुक्ता नुकत्याच परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टीकर यांनी जाहीर केल्या असुन प्रदेश उपाध्यक्षपदी बुलढाण्याचे चंद्रकांत बर्दे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्याकडे पश्चिम विदर्भाचा पदभार राहणार आहे.
चंद्रकांत बर्दे अनेक वर्षापासून मराठी पत्रकार परिषदेशी एकनिष्ठ आहे.त्यांच्याकडे यापूर्वी बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या सरचिटणीस, कार्याध्यक्ष आणि सध्या ते जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. त्यांची नियुक्ती जाहीर झाल्यानंतर जिल्हा पत्रकार भवन परिसरात फटाके फोडून स्वागत केल्या गेले. यावेळी पत्रकार राजेंद्र काळे, रणजित राजपूत, संजय मोहिते,जितेंद्र कायस्थ, प्रा.सुभाष लहाने, राजेश डिडोळकर, भानुदास लकडे, सचिन लहाने, संदिप वानखडे, रहेमत अली, शौकत शहा, विनोद सावळे आदींनी स्वागत केले.