30 डिसेंबरला साखरखेर्डा येथे राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या दिग्गज व्यक्तींचा होणार सन्मान
कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ।

साखरखेर्डा:-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:-दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दैनिक भारत संग्रामच्यावतीने स्वर्गीय मधुकरराव खंडारे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त तसेच सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व समाजभूषण अर्जुन गवई यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा 30 डिसेंबर रोजी राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे ,बुलढाणा जिल्हा तसेच बाहेरील जिल्ह्यामध्ये अनेक शैक्षणिक सामाजिक राजकीय अधिकारी असेल कर्मचारी असेल असे अनेक चांगले व्यक्ती काम करत असतात परंतु त्यांची दखल कोणी घेत नाही त्यांच्या कामाला गती मिळावे ऊर्जा मिळावे म्हणून दैनिक भारत संग्रामच्या वतीने त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देण्याचे ठरवले आहे ‘ सदर कार्यक्रमाला माजी आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे ‘ आमदार मनोज कांयंदे . स्वाभिमानी शेतकरी संघटना क्रांतिकारी संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर , मेहकर चे आ . सिद्धार्थ खरात भाई कैलास सुखधाने ‘लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनल चे गजेंद्र गवई ‘ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे .
तर प्रमुख वक्ते म्हणून उपविभागीय अधिकारी संजय खडसे त्याचबरोबर प्रवीण गीते राहणार आहेत ‘ कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामभाऊ जाधव हे असणार आहे ‘ तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून अनिकेत सैनिक स्कूलच्या सचिव सौ प्रतिभाताई अर्जुन गवई व साखरखेर्डा सरपंच सुमनताई सुनील जगताप ,हे करणार आहेत ,कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष म्हणून रावसाहेब देशपांडे महाराष्ट्र प्रदेश भाजपा सदस्य ‘ तर केंद्रप्रमुख दिलीप खंडारे हे असणार आहे ‘सदर कार्यक्रमाला तहसीलदार अजित दिवटे ‘ ललित शेठ अग्रवाल ‘ माजी सेवानिवृत्त प्राचार्य रमेश ठोसरे सर ‘साखरखेर्डा ठाणेदार गजानन करेवाड . जिल्हा वाहतूक नियंत्रक स्वप्निल नाईक ‘ अंडर पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील ‘ यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित असणार आहेत ‘सदर कार्यक्रम 30 डिसेंबर रोजी अनिकेत सैनिक हायस्कूल शेंदुर्जन रोड येथे असून सकाळी दहा वाजेपासून शाहीर संघपाल गवई व बाल व्याख्यानकार कुमारी प्रांजली प्रशांत जाधव यांचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे ,सदर कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे .