Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)

संत निरंकारी मिशनच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान महोत्सवात निरंकारी भक्तांचे रक्तदान !

संत निरंकारी मिशनच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान महोत्सवात १७१ निरंकारी भक्तांचे रक्तदान !

Spread the love

मानवतेला समर्पित भावनेतून निरंकारी मिशनतर्फे नांदुरा येथे भव्य रक्तदान महोत्सव संपन्न

 मलकापुर :-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी-रविंद्र गव्हाळे:-  नांदुरा येथे सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या पवित्र आशीर्वादाने रविवार, २९/१२/२०२४ रोजी संत निरंकारी मिशन ची सामाजिक शाखा, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान महोत्सवाचे आयोजन शाखा नांदुरा, संभाजीनगर झोन येथे करण्यात आले होते. यामध्ये १७१ संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी निस्वार्थीपणे रक्तदान केले. रक्त संकलनाकरिता उपजिल्हा सामान्य रुग्णालय खामगाव आणि लेडी होर्डिंग अकोला रक्तपेढी यांनी आपले योगदान दिले. उद्घाटनाच्या अगोदर संपूर्ण नांदुरा शहरात मिशनच्या सेवादल महिला निळी वर्दी व पुरुष खाकी वर्दी मध्ये अनुयायी यांनी रक्तदान जनजागृती रॅली चे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन स्थानिक आमदार चैनसुख संचेती व संतोष शेगोकार संयोजक जिल्हा बुलढाणा यांचे यांचे शुभहस्ते संपन्न झाले. उद्घाटन प्रसंगी आमदार चैनसुख संचेती यांनी निरंकारी मिशनच्या माध्यमातून होणाऱ्या सामाजिक कार्याची माहिती दिली.

संत निरंकारी मिशन द्वारा मानवतेच्या कल्याणार्थ वेळो-वेळी संपूर्ण विश्वामध्ये अनेक जनसेवेचे उपक्रम आयोजीत करण्यात येतात, ज्यामध्ये मुख्यतः स्वच्छता अभियान, अमृत प्रोजेक्ट, वृक्षारोपण, वननेस वन, निशुल्क आरोग्य तपासणी ,नेत्र चिकित्सा शिबीर तसेच महिला सशक्तीकरण, बाल-विकास, नैसर्गिक संकटांच्या वेळी सहायता यांसारख्या अनेक कल्याणकारी योजनांचे आयोजन केले जाते. यासारख्या सर्व सामाजिक कार्यासाठी भारत सरकार तसेच राज्य सरकारांद्वारे मिशनला वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे.रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी संत निरंकारी मिशनचे मुखी साजनदास रामचंदानी यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.सेवादल संचालक सुनील गवरे व शिक्षक मदनलाल जी यांनी शिबिरामध्ये उपस्थित मान्यवरांचे तसेच रक्तदात्यांचे आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page