बुलढाणा तालुक्यात गावागावात बैठका…
सकल मराठा समाज एकटवला परिचय मेळाव्यासाठी...

बुलढाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी: महाराष्ट्र मराठा सोयरीक संघाची नुकतीच येळगाव येथे गजानन गडाख यांच्या निवासस्थानी बैठक झाली. मेळाव्याची पूर्वतयारी सर्व स्तरातून सुरू असून हा मेळावा भव्य दिव्य करण्याचे प्रयत्न आयोजकाकडून केले जात आहे. त्यानुसार बुलढाणा तालुक्यामध्ये विविध ठिकाणी बैठका व चर्चासत्र पार पडत आहे.
सामूहिक विवाह सोहळे ही काळाची गरज आहे. सध्या शेतकरी वर्ग प्रचंड हालाखीत असून आत्महत्येच्या दारात उभा आहे. अशा वेळी सामूहिक विवाह ही संकल्पना स्वीकारल्यास समाजासाठी ती हितकारक आहे. या उद्देशाने सुनील जवंजाळ पाटील यांनी प्रयत्न सुरू केले असून वधुवर परिचय मेळावे निशुल्कपणे घेण्याचा एक स्तुत्य उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे.
बैठकीमध्ये बुलढाणा शहरामध्ये 5 जानेवारीला गर्दे हॉलमध्ये होणाऱ्या सकल मराठा वधु वर परिचय मेळाव्यासंबंधी गावकऱ्यांना माहिती करून देण्यात आली. त्याचबरोबर पालकांना वधूवरांना सोबत घेऊन मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आव्हान या बैठकीच्या निमित्ताने महाराष्ट्र मराठा सोयरीकचे संकल्पक सुनील जवंजाळ यांनी केले. बैठकीपूर्वी गावकऱ्यांच्या वतीने सुनीलभाऊ जंजाळ यांचा छोटे खाणी सत्कार करण्यात आला. बैठकीमध्ये समाजामध्ये निर्माण झालेल्या विदारक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला, आज प्रत्येक गावामध्ये 5- 50 मुले अशीआहेत की ज्यांचे लग्न होतील की नाही अशी अवस्था निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये समाजाने आता जातीच्या भिंती पाडून मराठा समाजामध्ये असलेल्या सर्व पोट जाती मध्ये आपापसामध्ये विवाह घडवून आणावेत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 5 जानेवारीच्या नियोजित वधू वर परिचय मेळाव्याचा तालुक्यामध्ये गावोगाव जाऊन प्रचार प्रसार व बैठका घेऊत असे सुतोवाच गजानन गडाख यांनी केले. मधल्या काळामध्ये हुंड्याचा भस्मासुर एवढ्या प्रमाणात वाढला होता की लोकांनी त्या काळामध्ये स्त्रीभ्रूणहत्या घडवून आणल्या .त्याची फळ आता या पिढीला भोगावी लागत आहेत.समाज बांधवांनी एकत्रित येऊन या जटील झालेल्या विषयावर तोडगा काढण्याची गरज निर्माण झालेली आहे. लग्नाळू मुलांचे लग्नांचे प्रश्न जर सुटले नाहीत तर भविष्यामध्ये मराठा समाज हा अल्पसंख्यांकाचे यादीत आल्याशिवाय राहणार नाही.त्यामुळे समाजातील सर्वच क्षेत्रातील मंडळींनी हा विषय हाती घेण्याची गरज असून या लोक चळवळीला आपापल्या परीने बळ देण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले.डोंगर खंडाळा, शिरपूर ,अंबोडा ,पाडळी , धाड,अशा विविध ठिकाणी समाजाच्या बैठका पार पडल्या व उर्वरित ठिकाणी बैठकांचे सत्र सुरू आहे. 5 जानेवारीला गर्दे हॉलमध्ये होणाऱ्या मेळाव्याचे आयोजन व नियोजन पूर्णतःजिजाऊंच्या च्या लेकिच करणार आहेत. महाराष्ट्र मराठा सोयरीकने महिला भगिनींना एक मोठे व्यासपीठ या निमित्ताने उपलब्ध करून दिलेले आहे. या मेळाव्याची सर्व सूत्रे महिलांच्या हाती राहणार असल्याचे सुनील जवंजाळ यांनी सांगितले .
सदर मेळाव्यामध्ये उच्चशिक्षित मुले मुली याचबरोबर शेतकरी कुटुंबातील मुले मुली यांच्या सोबतच विधवा विदुर घटस्फोटीत अपंग यांच्यासाठी स्वतंत्र सत्र घेणार असल्याचे अरविंद बापू देशमुख यांनी सांगितले. यापूर्वी बुलढाणा शहराच्या इतिहासातील पहिला विधवा विदुर घटस्फोटीत अपंग मेळावा 16 एप्रिल 2017 मध्ये गर्दे वाचनालय येथे महाराष्ट्र मराठा सोयरिक च्या वतीने आयोजित केल्याची आठवण प्रा नवनिता चव्हान यांनी करुन दीली. . स्व डॉ रामदास भोंडे या मेळाव्यात सक्रिय होते. .बैठकीमध्ये बुलढाणा तालुक्यामध्ये घरोघर जाऊन मेळाव्याच्या प्रचार व प्रसार करण्यासंबंधी नियोजन करण्यात आले. बैठकीला विजय पडोळ, विजय नेमाडे, पंडित काकडे, सागर बोकाडे, निलेश खंडागळे, सागर वांजोळ, अशोक गडाख सदानंद घड्याळे, दिनकर फसले,बैठकीमध्ये बहुसंख्य गावकरी उपस्थित होते