चंद्रकांत बर्दे यांचा मराठी पत्रकार परिषदेच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी निवडी बद्दल मा.आमदार विजयराज शिंदे यांच्या हस्ते सत्कार

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- पत्रकारांच्या न्याय्य हक्कासाठी झटणारी, राज्यातील पत्रकारांची मातृसंस्था, पत्रकारांची पहिली संघटना असणाऱ्या “मराठी पत्रकार परिषदेच्या” प्रदेश उपाध्यक्ष दैनिक विश्वविजेताचे संपादक, भाजपा जिल्हा सचिव श्री चंद्रकांतजी बरदे यांची नुकतीच निवड झाली आहे. या निवडी बद्दल दि.२८ डिसेंबर २०२४ रोजी भाजपा नेते मा.आमदार विजयराज शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालय शिवालय येथे त्यांचा भाजपा पदाधिकाऱ्यांनी मोठ्या आनंदात कौटुंबिक स्वागत सत्कार करण्यात आला.
यावेळी विजयराज शिंदे यांनी श्री चंद्रकांतजी बरदे यांचा स्वागत सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी विजयराज शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “चंद्रकांत बरदे एक बहुआयामी व्यक्तिमत्व असून, पत्रकार बांधवांच्या न्याय हक्कांसाठी झटणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा हा खरा सन्मान आहे त्यांच्या रूपाने पुन्हा एकदा बुलढाणा जिल्ह्याला हा बहुमान मिळाला आहे.” अश्या भावना व्यक्त केल्या आहे.
सत्कार मूर्ती चंद्रकांत बरदे यांनी यांनी सत्काराला उत्तर देतांना भावनिक होऊन मिळालेल्या जबाबदारीचे सोने करून “पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी या निवडीने नक्की बळ मिळाले असून पूर्ण क्षमतेने काम करण्याचे आश्वासन आपल्या मनोगतातून दिले.
या कौटूंबिक सत्कार सोहळ्यास भाजपा कामगार मोर्चा प्रदेश सचिव विश्राम पवार, प्रदेश प्रतिनिधी श्री अण्णा पवार, भाजपा जिल्हा सचिव दत्ता पाटील,ऍड दशरथसिंग राजपूत, भाजपा महिला मोर्चा मा.जिल्हाध्यक्ष सौ सिंधुताई खेडेकर, सौ उषाताई पवार, सौ शोभाताई,भाजपा कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष दत्ता शिंदे, गणेश देहाडराय, तुकाराम राठोड, प्रशांत बोरसे, अकिल हाजी, शेख रशीद, युसूफ भाई,प्रदीप सोनटक्के, माजी नगरसेवक संजय अग्रवाल, संजय तोटे, पप्पू सोनकर, नारायण हेलगे,सतीश देहाडराय,यतीन पाठक,संजय जुंबड ई मान्यवर उपस्थित होते तर या कौटुंबिक सत्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन भाजपा माजी शहराध्यक्ष श्री अनंता शिंदे यांनी केले.