सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, बुलढाणा मार्फत राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा

बुलढाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:ग्राहकांच्या हितांचे संरक्षण करण्याकरिता भारत सरकारने 1986 रोजी ग्राहक संरक्षण कायदा लागू केला. त्याअनुषंगाने दरवर्षी 24 डिंसेबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक म्हणून मानला जातो. या दिवसाचे औचित्य साधुन स्थानिक सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य व विज्ञान विभागाच्या इयत्ता 11 वी व 12 वी च्या विद्याथ्र्यांनी राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा केला.
या दिवशी विद्याथ्र्यांनी बुलढाणा शहरातील ग्राहकांची जनजागृती करण्यासाठी रॅली काढली. जयस्तंभ चौक ते कारंजा चौक या बाजार परिसरात रॅली दरम्यान विद्याथ्र्यांनी, ग्राहकांच्या अधिकारांची जाणिव करुन देण्याकरिता, भारतीय ग्राहकांना मिळालेल्या सहा अधिकारांची माहिती असलेले पत्रके लोकांना व स्थानिक दूकानांतील ग्राहकांना वितरित केले तसेच ग्राहक अधिकारांची माहिती देखील दिली. या रॅली चा समारोप जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे संपन्न झाला. त्या ठिकाणी श्री. जंगम साहेब (अधिक्षक तथा जिल्हा खनिकर्म अधिकारी), श्री. गजानन पद्मने (विधी अधिकारी) व श्री. रविंद्र लहाने (जिल्हाधिकारी यांचे स्विय सहाय्यक) यांनी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले.
बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष श्री. राधेश्यामजी चांडक, संस्थेच्या अध्यक्षा सौ. कोमल झंवर तसेच संस्थेचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. सुकेश झंवर यांनी विद्याथ्र्यांच्या या कार्याचे कौतुक केले.सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक व विद्याथ्र्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे बुलढाणा परिसरातील जनतेमार्फत कौतुक केल्या जात आहे.