आमदार चैनुसूख संचेती यांनी भरवला मलकापूर येथे जनता दरबार

मलकापुर :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- रवींद्र गव्हाळे :- मलकापुर येथे भातृ मंडळ आयोजित भव्य जनता दरबार हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात मलकापुर तालुक्यातील जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी तसेच त्या सोडवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच जनतेचे प्रश्न तातडीने सोडवण्याच्या दृष्टीने ठोस उपाययोजना करण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.
माननीय आमदार चैनसुखजी संचेती, भारतीय जनता पक्ष.महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष. यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. त्यांनी आपल्या मनोगतातून जनता दरबार हा लोकांच्या समस्या सोडवण्याचा आणि विकासकामांना गती देणारा प्रभावी मार्ग असल्याचे प्रतिपादन केले.
त्यांनी शेतरस्त्यांचे उत्कृष्ट जाळे, शेतशिवाराचे समृद्धीकरण, प्रत्येक घरात वीज, उत्तम आरोग्यसेवा, आणि दवाखान्यांच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या उद्दिष्टांवर भर दिला. यावेळी अनेक शासकीय कर्मचारी, पदाधिकारी, व स्थानिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाने स्थानिक जनतेत उत्साह निर्माण केला असून त्यांच्या समस्या तातडीने सोडवण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.