आ.सिद्धार्थ खरात यांच्या संकल्पनेतून जानेफळ येथे”एक सुर एक ताल” कार्यक्रमाचे आयोजन
उत्कर्ष फाउंडेशन कडून आयोजन: युवकांना मिळणार नवी दिशा

मेहकर:- आपला बुलढाणा जिल्हा बातमी:-मेहकर लोणार मतदार संघातील नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ रामभाऊ खरात हे निवडून आल्या पासून त्यांनी विविध कामाचा झपाटा लावला असून विविध उपक्रम हाती घेतले आहे विशेष म्हणजे तरुण युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून युवक बिरादरी संस्थेला 50वर्ष पूर्ण झाल्या बद्दल आमदार सिद्धार्थ खरात यांच्या संकल्पनेतून उत्कर्ष फाउंडेशन सिंदखेड राजा व युवक बिरादरी भारत यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि.३१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता श्री सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय जानेफळ येथे युवक बिरादरी भारत अंतर्गत एक सुर एक ताल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाअंतर्गत तरुण युवकांना औद्योगिक कौशल्य विकास,व्यक्तिमत्व विकास, आत्मविश्वास या बाबतीत योग्य मार्गदर्शन मिळणार आहे. युवक बिरादरी प्रकल्प हा संस्थापक अध्यक्ष पद्मश्री क्रांतीशाहा,अध्यक्ष अभिषेक बच्चन,उपाध्यक्ष रितेश देशमुख यांच्या मार्फत जगभरात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते आमदार सिद्धार्थ खरात यांनी मेहकर तालुक्यातील युवकांना फायदा व्हावा म्हणून पहिल्यांदाच आगळे वेगळे आयोजन केले आहे.
एक सुर एक ताल.. या अभियानाचे प्रशिक्षक.. प्राध्यापक.. अतुल सुंदरकर.. (आंतरराष्ट्रीय गायक.. आणि प्रशिक्षक.२०१४ चा उत्तर प्रदेश शासन शिक्षण विभागाकडून गौरव पुरस्करिनी. २०२४ व्हिएतनाम देशात. हँग बँग इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी तर्फे पुरस्कार.. नुकताच मिळाला.
कृष्णा रत्नपारखी (तबला वादक )प्रवीण पवार (विविध तरंगिनी वादक )key board Player..अक्षय जाधव..( नृत्य दिग्दर्शक) पंकज उनोने(साऊंड इंजिनियर) अंकुश मालवे,बाळूभाऊ पाखरे, पत्रकार गणेश सवडतकर मुख्याध्यापक प्रा डॉ रामदास धामोडकर,उपमुख्याध्यापक गजानन जाधव, पर्यवेक्षक डॉक्टर शिवाजी म्हस्के, विज्ञान शिक्षक डॉ. बाहेकर,श्री पाटील, श्री शिंदे,श्री पेटकर,श्री काळे आदींची उपस्थिती राहणार आहेत तर जास्तीत जास्त युवकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य संयोजक पुरुषोत्तम बोर्डे यांनी केले आहे.