शिवसाई युनिव्हर्सल व ज्ञानपीठ स्कूलच्या विद्यार्थ्यांचा क्षेत्रभेटीचा अनोखा उपक्रम…

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- नुकत्याच शिवसाई युनिव्हर्सल व ज्ञानपीठ स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच आपला व्यक्तिमत्व विकास व्हावा विद्यार्थ्याना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच व्यवहारिक ज्ञान मिळावे दृष्टिकोनातून विविध शासकीय कार्यालयाचे कामकाज कसे चालते याचा अनुभव विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कार्यालयांना भेटी दरम्यान मिळाला त्यांना संबंधित कार्यालयाचे अधिकारी साहेब सोबत संवाद साधता आलां विद्यार्थांनी आपले विविध प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले. संबंधित कार्यालयांमध्ये कोणकोणते कामे कसे चालते. त्या कार्यालयातील सर्व कामाची रूपरेषा विद्यार्थ्यांनी समजावून घेतली. शिवसाई युनिव्हर्सल स्कूलमध्ये 15 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये क्षेत्रभेटीचा उपक्रम राबविण्यात आला होता. यात विद्यार्थ्यांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलीस स्टेशन, कृषी अधिकारी कार्यालय, जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळा, मेडिकल कॉलेज, अपंग शाळा, बाजार भेट, अशा विविध कार्यालय भेटी घेतल्या, व कार्यालयातील कामकाज कसे चालते याची माहिती मिळवली.विद्यार्थ्यांना या उपक्रमात शाळेचे प्राचार्य प्रमोद मोहरकर व क्रीडा शिक्षक सागर उबाळे, सहाय्यक शिक्षीका प्रिती नायडू यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तेव्हाच ही विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट पूर्ण झाली. विद्यार्थ्यांना या क्षेत्रभेटीपासून अनेक छोट्या मोठ्या माहिती मिळाली. विद्यार्थ्यांना नक्कीच आयुष्यात या क्षेत्रभेटीचा फायदा होईल हे निश्चित..
हसत खेळत व प्रत्यक्ष अनुभवातून मिळालेले शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास प्रेरक ठरते शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विविध संधी ऊपलब्ध करुन द्यायला हवे जेनेकरून विद्यार्थी आपल्या क्षमता व बलस्थाने ओळखतील शिवसाई शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच सामाजिक व व्यवहारिक ज्ञान मिळावे करीता प्रयत्नशील असते- डी. एस. लहाने. संस्थाचालक तसेच मा. जि प सदस्य