व्यायाम शाळेला स्वतंत्र रस्त्याची मागणीसाठी युवाकांचे पालिकेत ठिय्या आंदोलन!
अल मदिना फाउंडेशनचे बुलडाणा नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलन!

बुलढाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- मिर्झा नगर येथे हाजी सैयद उस्मान सैयद मन्नू डोंगरे नगर परिषद उर्दू शाळा क्रमांक 2 मध्ये असलेली व्यायाम शाळा येथे जाणयासाठी स्वतंत्र रास्ता करुन देण्याची मागणीसाठी अल मदिना फाउंडेशनचे अध्यक्ष नदीम शेख यांच्या नेतृत्वात आज गुरुवारी 2 जानेवारी रोजी बुलडाणा नगर परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
शहरातील मिर्झा नगरात उर्दू शाळेत नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने दोन- तीन वर्षापूर्वी व्यायाम शाळा बांधण्यात आली होती. मात्र या व्यायाम शाळेत जाण्यासाठी रस्ताच नसल्याने तरुणांना भिंतीवरून उडी मारून जावे लागत आहे. त्यामुळे व्यायाम शाळेत जाण्यासाठी स्वतंत्र रस्ता करून देण्यात यावा अशी मागणी नदीम शेख यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे केली होती. प्रशासनाने वेळेवर दखल ना घेतल्याने अल मदिना फाउंडेशनच्या वतीने आज ठिय्या आंदोलन मांडण्यात आला. यावेळी नगरपरिषद प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.अखेर पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करून आंदोलकांची नगरपरिषद प्रशासनासोबत चर्चा घडवून आणली. आपल्या समस्या शक्य तितक्या लवकर व तातडीने सोडवण्यात येईल असा शब्द दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यासह परिसरातील इतर समस्यांबद्दलही नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. बंद पडलेल्या कमेल्यामधील डुकरांचा बंदोबस्त करावा , कमेला परिसरात दररोज घंटागाडी पाठवावी या मागण्याही प्रशासनाकडे करण्यात आल्या. अखेर या समस्या तात्काळ मार्गी लावण्याचा शब्द मुख्याधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी
शेख अन्सार, अली नवाज़, वसीम खान, शेख जुनैद, मो. फरहान, इरफान शाह, एजाज खान, बबलू खान, शानू मेंबर, मो. शाहेद, शेख साजिद, अरबाज खान, अकील खान, जावेद खान, निसार खान, एसके शरीम, शेख सलमान, नाझिम खान, शाहरुख खान, शोएब बागवान, नसीम खान, आलियान खान आदि तरुण उपस्थित होते…