मेडिकल कॉलेज हतेडीत नको बुलढाण्यातच व्हावे..
बुलढाणा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीने केंद्रीय राज्य मंत्र्यांकडे केली मागणी..

बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- महाराष्ट्र शासनाने बुलडाणा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले आहे.. 2024-25 पासून हे महाविद्यालय बुलडाणा येथे सुरु झालेले आहे..परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे हतेडी बु. येथे करण्याचे प्रस्तावित आहेत.. परंतु हे महाविद्यालय बुलडाणा हे जिल्हयाचे ठिकाण असून मध्यवर्ती आहे.. बुलडाणा येथे आवश्यक असणाऱ्या भौतिक सोईसुविधा,जागा, इमारत इत्यादी गोष्टी उपलब्ध आहेत.. शासकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असणारी बेडची संख्या उपलब्ध आहे..
शासनाने नेमलेल्या अध्यास समितीने सुध्दा बुलडाणा येथेच हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होण्यास उपयुक्त ठिकाण आहे असे नमूद केले आहे..हतेडी हे ठिकाण सर्व दृष्टीने गैरसोईचे असल्यामुळे रुग्णांना त्रास होईल व रुग्णांचा वेळा वाया जाईल.. बुलडाणा येथे शासकीय वैद्यकोव महाविद्यालय झाल्यास शासनाचा इमारतीवर होणारा मोठा खर्च वाचू शकतो तरी, बुलडाणा जिल्हयातील सर्व जनताहरण व विद्यार्थी यांच्या वतीने प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बुलडाणा येथेच व्हावे अशी मागणी बुलढाणा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीच्या वतीने आज केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे करण्यात आली आहे.. तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन सुद्धा त्यांनी जिल्हाधिकारी यांना सुद्धा दिले आहे..