खामगांव येथील युवकाचा प्रामाणिक पणा सापडलेला मोबाईल दिला परत…

खामगांव :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- येथील एकनिष्ठा गौ – सेवा रक्तसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या यादव हे शहरातील बारादरी परिसरात दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी एका जखमी असलेल्या गौ मातेचा उपचारासाठी तिला पकडण्यासाठी तिचा रिस्क्यू करत असतांना त्यांचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल अंदाजे 24,500 रुपये किंमतीचा असलेला मोबाईल फोन पडला तो मोबाईल फोन राजु भारत सावंग राहणार दालफैल यांना सापडला असता त्यांनी तो फोन आपल्या सोबत नेला स्विच ऑफ न करता त्यांनी सुरू ठेवला यादव यांच्या फोनवर अभिषेक देशमुख, सौरभ पाटील, कुंदन साबळे संपर्क साधला असता त्यांनी राजु सावंग यांना माहिती दिली हा फोन सुरजभैय्या यांचा आहे. अशी माहिती देताच सावंग यांनी प्रामाणिक पणा दाखवून सापडलेला मोबाईल फोन सुरजभैय्या यांच्या कडे नेऊन दिले. या युवकाच्या प्रामाणिक पणाचे कौतुक एकनिष्ठा फाउंडेशन कडून करण्यात आले.