Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)

केंद्रीय मानव अधिकार नवी दिल्ली . बुलढाणा जिल्हा उपाध्यक्षपदी शुभम प्रविण सावळे यांची निवड…!

Spread the love

मलकापूर: आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- मलकापूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रा. शुभम प्रवीण सावळे यांची बुलढाणा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

बुलढाणा जिल्हा मध्ये केंद्रीय मानवाधिकार संघाची माहिती सर्व सामान्य माणसांमध्ये पोहोचवणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. मानवाधिकार संघ हे नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविते व न्याय मिळून देणारी संघटना आहे. भारतीय राज्यघटनेनुसार नागरिकांना जे मुलभूत अधिकार दिलेले आहेत ते बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकाना माहिती करून देणे .तसेच कुठेही जर मानव अधिकारांवर अन्याय होत असेल तर तिथे संघटनेच्या माध्यमातून नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे महत्वाचे काम हि संघटना करते .नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास त्यांनी त्वरित संपर्क करावा , त्यांच्या अडचणी निश्चितच सोडवल्या जातील असे असे प्रा. शुभम प्रवीण सावळे यांनी यावेळी सांगितले .त्यांच्या ह्या नियुक्ती बद्दल त्यांचे राजकीय , समाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रातील तसेच सर्वसामान्य नागरिक त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page