साखरखेर्डा येथे रंगला राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा !
काम करण्याचं बळ म्हणजेच पुरस्कार - उपविभागीय अधिकारी प्रा संजय खडसे

साखरखेर्डा:- आपला बुलढाणा जिल्हा बातमी:- दैनिक भारत संग्राम आयोजित स्वर्गीय मधुकरराव खंडारे यांच्या प्रथम स्मृतिप्रीत्यर्थ व समाजभूषण अर्जुन गवई यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान सोहळा दिनांक 30 डिसेंबर रोजी अनिकेत सैनिक हायस्कूलच्या प्रारंगणामध्ये पार पडला ‘
सुरुवातीला शाहीर संघपाल गवई व बालकलाकार प्रांजली प्रशांत जाधव यांचा गायनाचा कार्यक्रम पार पडला .प्रमुख मान्यवर आल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साखरखेर्डा गावचे उपसरपंच सय्यद रफीक ,तर प्रमुख वक्ते म्हणून उपविभागीय अधिकारी सिंदखेडराजा संजय खडसे ‘ लोकजागर परिवाराचे विश्वस्त प्रवीण गीते ‘ लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनेल चे प्रवीण गीते ‘ बाल व्याख्यानकार प्रांजली प्रशांत जाधव हे होते ,सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले ,त्यानंतर स्वागत अध्यक्ष माजी केंद्रप्रमुख दिलीप खंडारे सर तसेच भाजपा प्रदेश सदस्य रावसाहेब देशपांडे यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले ,त्यानंतर विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले शेतकरी नेते रविकांत तुपकर ‘उपविभागीय अधिकारी प्रा संजय खडसे ‘ सय्यद रफीक उपसरपंच ‘ प्रवीण गीते ‘ वर्षाताई कंकाळ . प्रतिभा उबरहंडे यांच्या हस्ते मान्यवरांना पुरस्कार देण्यात आले ‘ त्यानंतर मार्गदर्शन करताना रविकांत तुपकर यांनी चौफेर फटकेबाजी केली पुरस्कार हा माणसाला प्रेरणा देत असतो प्रत्येक मनुष्य हा कोणत्यातरी क्षेत्रामध्ये नैपुण्य मिळवत असतो यावेळी रविकांत तुपकर यांनी बालपणीच्या आठवणी सांगितल्या तसेच सोयाबीन आणि कापूस म्हटलं की रविकांत तुपकर आठवतो असे सुद्धा त्यांनी सांगितले आपण शेतकरी एकत्र येत नाही अशी खंत त्यांनी बोलून दाखवली ‘
त्यानंतर प्रवीण भाऊ गीते यांनी सुद्धा मार्गदर्शन केले त्यानंतर उपजिल्हाधिकारी प्रा संजय खडसे यांनी पुरस्कार हे काम करण्याचे बळ देत असतं पुरस्कार देत असताना आणि घेत असताना अनेकांनी आपले आई-वडील बोलावले खरोखरच आनंद झाला खऱ्या अर्थाने कर्तबगार मुलांचे हे कार्य पाहुन आपल्या आई-वडिलांचा आनंद होत असतो ‘ अशी सुद्धा त्यांनी सांगितले त्यानंतर लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनल चे गजेंद्र गवई साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले ,
पुरस्कार प्राप्त मान्यवरामध्ये ‘
आदर्श शिक्षक ‘ शिक्षिका ‘ उत्कृष्ट कर्मचारी ‘ उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांसाठी राष्ट्रमाता माँ जिजाऊ पुरस्कार ‘ उत्कृष्ट पत्रकारिता ‘ सामाजिक क्षेत्रात संत गाडगेबाबा पुरस्कार .देण्यात आले ‘त्यानंतर अर्जुन गवई यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला ‘
सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये माजी उपसरपंच रामदास सिंग राजपूत , मा ‘ सेवानिवृत्त मुख्याध्यापक रमेश ठोसरे सर , मा प्राचार्य संतोष दसरे , ग्रामसेवक सोसायटीचे अध्यक्ष ललित अग्रवाल ‘भगत सर ‘ अमोल मोरे ‘ वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विशाल गवई ‘ एडवोकेट वर्षाताई कंकाळ ‘ प्रतिभाताई उभरहांडे ,युनिस पटेल ‘ इब्राहिम शहा ‘ कमलाकर गवई माजी सरपंच , सुनील रिंढे ‘ शिवसेना नेते संदीप मगर ‘दर्शन कुमार गवई तंटामुक्तीचे अध्यक्ष संतोष मंडळकर,भाजपचे जलम सिंग ठाकूर ‘ मंगल सिंग ठाकूर ‘ शुभम राजपुत उमन गावचे सरपंच भीमराव खिल्लारे ‘पोलीस पाटील पंडित खिल्लारे ‘ सुनील खंडारे ‘ डॉक्टर गंगाराम उबाळे ‘ भगवान साळवे ‘ महादू गवई ‘ शरद सरकटे ‘ अमोल गवई ‘ विकास सुखदाने ‘ राजेंद्र मोरे ‘ विठ्ठल राठोड ‘ राहुल डोंगरदिवे डोंगरदिवे , सतिष डोंगदिवे ‘सुभाष तोडे निलेश जाधव ‘ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन वैशालीताई तायडे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार मुख्य आयोजक सचिन खंडारे यांनी केले ‘ यावेळी प्राचार्य जाधव ‘ देवानंद शिंदे ‘ मंगेश सरकटे काळूशे ‘ जाधव ‘ हरीश सुरुशे ‘ गुड्डू अंभोरे ‘ यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले ‘