Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)

पुरोगामी पत्रकार संघाच्या राज्य अध्यक्षपदी विष्णू कंकाळ यांची निवड जाहीर…

Spread the love

बुलढाणा-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- पुरोगामी पत्रकार संघाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी विष्णू कंकाळ यांना पुरोगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांनी जाहीर केले आहे कित्येक वर्षापासून पुरोगामी पत्रकार संघाच्या सोबत एकनिष्ठतेने काम करीत आहेत त्यांनी पुरोगामी पत्रकार संघामध्ये यापूर्वी प्रथम जिल्हाध्यक्ष पदापासून सुरुवात केली आणि नंतर राज्य उपाध्यक्ष राज्य कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला त्यांच्या कामाचे स्वरूप आणि त्यांचे काम करण्याची जिद्द संघाच्या वरिष्ठांनी पाहिली आहे .त्यामुळे त्यांच्याकडे राज्य अध्यक्ष पदाची जबाबदारी पुरोगामी पत्राकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय सूर्यवंशी ,राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब अडागळे ,राष्ट्रीय महासचिव विनोद पवार ,राष्ट्रीय सल्लागार सुभाष बिंदवाल, राष्ट्रीय सचिव प्रवीण परमार तसेच वरिष्ठ अधिकारी यांनी विष्णू कंकाळ यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या राज्य अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे .आपल्याला सोपवलेली मोठी जबाबदारी विष्णू कंकाळ यांनी पुरोगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय सूर्यवंशी आणि वरिष्ठांचे आभार मानले. राज्य अध्यक्ष पद मिळाल्याबद्दल विष्णू कंकाळ यांच्यावर महाराष्ट्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page