किनगाव जटू येथे घाणीचे साम्राज्य आरोग्य आले धोक्यात…

किनगाव जटु ता. लोणार -आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- येथील जि.प. प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेजवळ मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र आहे. कचरा घंटागाडी केवळ नावालाच असुन वित्त आयोग निधी केवळ कागदोपत्रीच खर्च होत असल्याचा आरोप सचिन नागरे यांच्याकडून होतो आहे. घरात शौचालय असुनही काही नागरिक प्रांतकाळी ( भल्या पहाटे) रस्त्याच्या कडेला शौचास बसतात.यामुळे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांच्या टायरला घाण चिटकून संपूर्ण गावामध्ये घाण पसरल्याचे चित्र आहे.यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.गावात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात असुन अनेक ठिकाणी घनकचरा उकिरडे साठलेले आहेत. गावात ठिकठिकाणी वाढते अतिक्रमण व मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरत असल्याकारणाने ग्रामपंचायत कर भरण्यासाठी अनेक नागरिक टाळाटाळ करित आहेत. बाबतीत कामे केवळ कागदावरतीच आहेत. तरी वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थ सचिन नागरे यांच्याकडून होते आहे. तसेच याबाबतची तक्रार सुध्दा त्यांनी ईमेल व्दारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे.