सकल मराठा समाज एकवटणार, परिचय मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात ….
रविवारी गर्दे वाचनालयामध्ये लग्नाळूची मांदियाळी !

बुलढाणा :-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- लग्न ही आता सामान्य बाब झाली आहे.मात्र काळाची पावले ओळखून समाजातील घटक एकत्र येऊन जेव्हा सामुहिक रित्या विवाह सोहळ्याला पसंती देतात तेव्हा घडून येतो तो सामुहिक विवाह सोहळा. बुलढाणा नगरीमध्ये सकल मराठा समाजाचा सामूहिक वधुवर परिचय मेळावा रविवार दिनांक 5 जानेवारी रोजी गर्दे सभागृहामध्ये होत आहे. त्यानिमित्ताने कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून रविवारी लग्नाळू ची मांदियाळी उसळणार आहे. आयोजकांनी आज कार्यक्रम स्थली जाऊन आढावा घेतला.
मेळाव्यामध्ये मराठा समाजातील सर्व पोट जातींना एकत्रित आणण्याचा प्रयत्न आयोजन समितीच्या वतीने करण्यात आलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने पाटील, कुणबी, देशमुख ,तिरळे कुणबी, खैरे कुणबी, वानदेशी, धनवटे ,घाटाखालचे, घाटावरचे, अशा सगळ्या पोट जाती वधू वर परिचय मेळाव्याच्या निमित्ताने एकत्रित येत आहेत.गत एक महिन्यापासून आयोजन समिती अथक परिश्रम घेत आहे. याच दरम्यान चिखली, बुलढाणा, मोताळा, तालुक्यातील गावागावांमध्ये बैठका झाल्या. सदर बैठकांना पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आयोजकांच्या म्हन्हंन्या नुसार दूरवरून वधू वर व पालक सहभागी होणार आहेत.
तीन सत्रांची व्यवस्था…
मेळाव्यामध्ये सकाळ च्या सत्रामध्ये आलेल्या वधू-वरांची नोंदणी केल्या जाईल, दहा वाजता व्यासपीठावरील कार्यक्रमाला सुरुवात होऊन जिजाऊ प्रतिमा पूजन होऊन कार्यक्रमास सुरुवात होईल. वधु वर परिचय मेळावा असल्यामुळे भाषण बाजीला फाटा देऊन वधू-वरांनाच कार्यक्रमांमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे. मेळाव्याचे आयोजन व नियोजन संपूर्णतः जिजाऊंच्या लेकीच करणार आहेत. मेळावा यशस्वी होण्याच्या दृष्टीने रामराव पाटील, प्रा जगदेवराव बाहेकर, डॉ अशोकराव खरात, सुनीलराव शेळके, नारायणराव मिसाळ, शिवाजीराव तायडे, श्रीकृष्ण जेऊघाले, डॉ सत्येंद्र भुसारी, डॉ मनोहर तुपकर, प्रकाश काळवाघे, डॉ मधुकर देवकर,विजय शिरसाट, प्रभाकरराव ताठे, अण्णासाहेब म्हलस्ने, अरविंद बापू देशमुख, डॉ शेषराव काळवाघे, डॉ किसनराव वाघ,प्रा रामदास शिंगणे, डॉ विनोद जवरे ,प्रभाकरराव काळवाघे ,सुनील सपकाळ, गणेशराव निकम, रमेश बुरकुल, भगवानराव कानडजे ,
पत्रकार सुरेखाताई सावळे , पूजाताई गायकवाड,डॉ संजीवनी शेळके, डॉ उषाताई खेडेकर प्रा नवनीत चव्हण, मालतीताई शेळके , मीनलताई आंबेकर, डॉ विजयाताई काकडे, डॉ लता बाहेकर, प्रतिभा भुतेकर, मंगलाताई पाटील, गीता उगले, किरण भोंडे, प्रतिभा भोंडे , तनुजा आडवे,आदी परिश्रम घेत आहेत.
वधू वर पालकांनी आपल्या पाल्यांसह बहुसंख्येने मेळाव्यात उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र मराठा सोयरिक चे संकल्पक सुनील जवंजाळ यांनी केले आहे.