राष्ट्रीय रस्सीखेच (Tug of war) स्पर्धेसाठी बुलढाणा जिल्हा खेळाडूंची निवड…

बुलढाणा:-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- टग ऑफ वार फेडरेशन ऑफ इंडिया न्यू दिल्ली यांच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र टग ऑफ वार असोसिएशन यांच्या वतीने
दिनांक 2 ते 4 जानेवारी 2025 दरम्यान चिंचणी बीच समुद्रकिनारा बोईसर जिल्हा पालघर येथे 36 वी आयोजित करण्यात आली आहे महाराष्ट्र संघाची राज्य स्पर्धा व निवड चाचणी दिनांक 14 ते 16 डिसेंबर 2024 रोजी चिंचणी बीच बोईसर पालघर येथे पार पडली या राज्यस्तरीय स्पर्धेतून बुलढाणा जिल्हा संघाने 440 किलोग्रॅम वजन गटांमध्ये कास्यपदक पटकावले. बुलढाणा जिल्ह्यातील खेळाडूंनी खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करून त्यांची बुलढाणा जिल्ह्याचे आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा प्रशिक्षक गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्राप्त श्रीराम निळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली महाराष्ट्र संघात शिवराज श्रीराम निळे यांच्या नेतृत्वात 440 kg.वयोगट 17 वर्ष मिक्स गटांमध्ये शिवराज श्रीराम निळे, आर्यन मनोज नाफडे, सोहम अशोक वारकरी, अदैवत अरविंद देशमुख, प्रथमेश अतुल उंबरकर, कु. मुद्रा मोहन वानखेडे, कू. मानसी दिनेश बकाले, कु.रिया दिगंबर कपाट