सिंधुदुर्ग सागरी जलतरण स्पर्धेत बुलढाण्याच्या जलतरणपटूंचे यश..
बापलेकांनी 3 कि.मी. चिवला बीच वेळेत केला पूर्ण..

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना व सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 14 वी राज्यस्तरीय खुल्या सागरी जलतरण स्पर्धेत बुलढाण्याच्या बापलेकांनी उत्कृष्ट यश मिळवून जिल्ह्याच्या नावलौकिकात भर घातली आहे.
या सागरी स्पर्धेत वय 05 ते 70 या वयोगटातील 1200 स्पर्धक सहभागी झाले होते.. बुलढाणा शहरातील सरस्वती विद्यालयातील आठव्या वर्गामध्ये शिकणाऱ्या हर्ष विष्णु गाढे याने 3 कि.मी. अंतराच्या स्पर्धा 53.23 मिनिटमध्ये पार केली.तर विष्णु भगवान गाढे यांनी 3 कि.मी. ही सागरी जलतरण स्पर्धा 34.55 मिनिटात पूर्ण केली आहे. विष्णु गाढे हे बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात सहाय्यक लेखा अधिकारी म्हणून कार्यरत आहे.गाढे यांच्यावर बुलढाणा शहर व जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे..