तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये घिर्णी शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रथम क्रमांक
घिर्णी शाळेतील विद्यार्थी विष्णू विनोद वनारे या विद्यार्थ्याने पटकावला तालुक्यातून प्रथम क्रमांक

मलकापुर :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी: रविंद्र गव्हाळे:- मलकापूर येथे ३ जानेवारी रोजी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी संपन्न झाली यामध्ये शहरातील तसेच ग्रामीण भागातील सर्वच शाळांनी सहभाग घेतला होता यामध्ये घिर्णी येथील शाळेचा उपकरण निर्मिती मध्ये तालुक्यातुन प्रथम क्रमांक विष्णू विनोद वनारे तसेच सागर शालिकराम भोपळे
प्रश्नमंजुसेमध्ये वैष्णवी रमेश बोपले तालुक्यातील तृतीय क्रमांक वैष्णवी विनोद गव्हाळे प्राथमिक विभागातून उपकरण निर्मितीमध्ये द्वितीय क्रमांक .प्राथमिक विभागामध्ये प्रोत्साहन पर बक्षीस धनंजय गोपाल धोरण. प्राथमिक विभागातून संघर्ष मधुकर शिरसाट स्वयंस्फूर्त भाषण मध्ये द्वितीय क्रमांक. ग्रामीण भागातील शाळांमधील या विद्यार्थ्यांचे यश बघून सर्वत्र विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे तसेच ग्रामीण भागात शिक्षणाचा पाया सुधारत चालल्याने विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकासाचा पायात चांगलाच भक्कम होत आहे त्यामुळे त्यांना आपल्या स्वप्नांना चांगलीच भरारी येईल हे निश्चितच .यामध्ये अजून विशेष बाब म्हणजे कौतुकाची घिर्णी शाळेचा इयत्ता पहिली चा विद्यार्थी धनंजय धोरण ने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत सहभाग घेऊन व आपल्या प्रयोगाचे इंग्रजीत वर्णन करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले, आदरणीय गटशिक्षणाधिकारी श्री फाळके साहेबांनी प्रोत्साहन पर बक्षीस देऊन धनंजय चा सत्कार केला.