Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)

आंबेडकरी व्हॉईस मिडिया फोरम च्या वतीने”मूकनायक सन्मान व पत्रकार दिन” ३१ जानेवारीला शेगावात

Spread the love

शेगाव :-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:समस्त देशासह राज्यभरातील आंबेडकरी पत्रकार समुहाच्या न्याय हक्कासाठी स्थापण झालेल्या ‘आंबेडकरी व्हाईस मीडीया फोरमची महत्वाची वार्षीक आढावा बैठक शेगाव शहरातील शासकीय विश्रामगृह येथे दि. ४जानेवारी शनिवार रोजी पार पडली. यावेळी येत्या ३१जानेवारी रोजी शेगाव जि. बुलडाणा येथे ‘मूकनायक’ सन्मान सोहळा ” व “पत्रकार दिन” भव्य दिव्य स्वरुपात साजरा करण्याचा प्रस्ताव एकमताने मंजुर करण्यात आला.

शेगाव शहरातिल शासकीय रेस्टहाऊस पार पडलेल्या बेठकीचे अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष उत्तम वानखडे होते तर केंद्रीय सचिव प्रकाश सरदार, प्रदेशाध्यक्ष महेद्र सावंग, , प्रदेश सचिव देवचंद्र सम्दुर,भाई सिद्धार्थ पैठने, पंडीत परघरमोर , दिनेश एखारे, प्रकाश तायडे राजेश तायडे यांची प्रमुख उपस्थीती होती. सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमांचे माल्यापर्ण करुन त्रिशरन पंचशिल घेण्यात आले.मागील वर्षी संघटनेची स्थापना झालेली असुन संघटनेत राज्यभरातील ३००च्या वर बौद्ध पत्रकार सभासद संख्या असुन दररोज नविन सदस्य जुळत असल्याची माहीती दिली.

तसेच विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३१ जानेवारी १९२० साली सुरु केलेल्या “मूकनायक” वर्तमानपत्राचा सन्मान सोहळा व मानवंदना म्हणुन भव्य ‘मूकनायक’ सन्मानार्थ देशात”पत्रकार दिन” साजरा करण्याबाबत निर्णय सर्वानुमते घेण्यात आला .

तसेच पत्रकारांच्या हित सबंधिबाबत सविस्तर ठराव मांडून सहमत करण्यात आला.या बैठकीत केंद्रीय अध्यक्ष उत्तम वानखेडे व केंद्रीय सचिव प्रकाश सरदार, राज्य अध्यक्ष महेंद्र सेवांग, राज्य सचिव देवचंद्र समदुर यांनी मुख्य मार्गदर्शन केले.

सदर ३१ जानेवारीच्या मूकनायक सन्मान सोहळा व पत्रकार दीन या कार्यक्रमाला युवकांचे आयडाॅल सुजातदादा आंबेडकर व ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणुन आमंत्रीत करण्याचा एकमुखी ठराव मंजुर करण्यात आला. आढावा बैठकीला खालिल पत्रकारांची उपस्थीती होती.कार्यक्रमाचे सूत्रसचालन बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ पैठणे यांनी केले. केंद्रीय उपाध्यक्ष महादेव धवसे,

उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश तायडे, राज्य उपाध्यक्ष राजेश तायडे, जळगांव जिल्हा अध्यक्ष दिनेश इखारे, रमेश खंडारे, राहुल इंगळे, रामेश्वर खरात, पंडित परघरमोर, मोनाली गणवीर,दिगंबर कंकाळ, राहुल सोनवणे, सुभाष वाकोडे, मुकेश हेलोडे, राहुल गवळी, अमोल अंबोरे, सागर शिरसागर, दिपक वाकोडे, पदमा मोहळ, विनोद गणवीर,

विकास खरात, शितल शेगोकर, विकास खरात, भिकाजी वाकोडे, इत्यादी पत्रकार उपास्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page