टी.बी.मुक्त अभियाना संदर्भांत केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी.नडा यांच्या अध्यक्षतेखाली आणि आयुष, आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत संपन्न झाली बैठक

बुलढाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- टी.बी.या संसर्गजन्य रोगाला देशातुन हदपार करण्याच्या दृष्टीकोनातुन भारत सरकारच्या वतीने टी.बी. मुक्त भारत अभियान संपुर्ण देशात राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या अमंलबजावणी संदर्भांत दिल्ली येथे आज महत्वपुर्ण बैठक झाली असुन या बैठकीत 100 दिवसांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात आरोग्य सेवा सर्वसामान्य लोकांना सुलभ आणि सहज उपलब्ध करण्याच्या दृष्टीकोनातुन केंद्रीय आरोग्य विभागामार्फत विविध योजना देशपातळीवर राबविण्यात येत आहे. टी.बी. या संसर्गजन्य आजारापासुन रुग्णांना मुक्त करण्यासाठी येणा-या काळात देशात टी.बी.मुक्त भारत अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियाना संदर्भांत आज 6 जानेवारीला दिल्ली येथे अंतर मंत्रालयीन बैठक केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी नडा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच.डी.कुमारस्वामी, केंद्रीय मंत्री आरोग्य राज्यमंत्री श्रीमती अनुप्रिया पटेल उपस्थित होते. या बैठकी दरम्यान टी.बी.मुक्त भारताला करण्याच्या दृष्टीकोनातुन करावयाच्या उपाययोजना आणि 100 दिवसांचे कृती आराखडा संदर्भांत सांगोपांग चर्चा करण्यात आली. या बैठकीला आरोग्य विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.