Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)

कानून के हात लंबे होते है..!

तब्बल एक वर्षापूर्वी चोरी गेलेली क्रूझर गाडी चोरट्यासह जप्त!जलंब पोलिसांची दमदार कामगिरी..!

Spread the love

खामगाव :- आपला बुलढाणा जिल्हा बातमी:- कानून के हात लंबे होते है..हा डायलॉग आपण पिच्चर मध्ये ऐकला असेल मात्र जलंब पोलिसांनी हा डायलॉग सत्यात उतरवत तब्बल एक वर्षापूर्वी चोरी गेलेली क्रूझर गाडी चोरट्यासह पकडून जप्त केली आहे.

 

एक वर्षांपूर्वी राहत्या घरासमोर उभी असलेली क्रूझर गाडी कोण्यातरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. ५ जानेवारी रोजी पोलिसांनी तब्बल एक वर्षानंतर गाडीसह आरोपीला पकडल्याची घटना उघडकीस आली आहे. जलंब पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या विनोद वाकोडे रा. माटरगाव ता. शेगाव यांच्या घरासमोर उभी असलेली क्रूझर गाडी एम एच १९ सी यु ३६७२ ही गाडी २३ जानेवारी २०२४ ला मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. तशी तक्रारही अज्ञात आरोपीविरुद्ध जलंब पोलिसात दाखल करण्यात आली होती. चोरी गेलेल्या क्रूझर गाडीची गोपनीय माहिती पोहेकॉ सचिन बावने यांना मिळताच ठाणेदार अमोल सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरवण्यात आली.सापळा रचण्यात आला एक वर्षांपूर्वी चोरी गेलेली क्रूझर गाडी ५ जानेवारी रोजी गाडीसह आरोपीला माटरगाव येथून ताब्यात घेतले असून आरोपी शिवलालसिंग हरीचंदसिंग राजपूत रा.खोलखेड ह.मु.माटरगाव याला अटक केली आहे.ही कारवाई ठाणेदार अमोल सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय श्याम पवार, देव साहेब,पोहेकॉ सचिन बावने, रवींद्र गायकवाड, गोविंदा व्होनमाने, अमोल कवळे, संदीप गावंडे, रितेश मसने यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page