Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)

बाप्पा….. बुलढाणा जिल्ह्य़ात टक्कल व्हायरसचा थैमान…

३ दिवसांतच पडतंय टक्कल!नेमका काय आहे प्रकार?

Spread the love

शेगाव:(आपलं बुलढाणाजिल्हा बातमी):- शेगाव तालुक्यात केस गळतीमुळे नागरिक भयभीत झाले आहे. वेगळ्या व्हायरसची एन्ट्री झाली का? अशी भीती नागरिकांमध्ये आहे. बुलढाण्यातली शेगाव तालुक्यात काही गावामधे नागरिकांना केसगळतीची समस्या जाणवत आहे. तीन दिवसांतच टक्कल पडत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. अनेकांनी खासगी रूग्णालयाची वाट धरली आहे, मात्र अद्याप हे का होतेय, याचं कारण समजू शकले नाही.

 

लक्षणे काय ?शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावात या अज्ञात व्हायरसने थैमान घातले आहे. या विषाणूची कुटुंब ची कुटुंब बळी ठरत आहेत. अगोदर डोके खाजवणे, नंतर हातात सरळ केस येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडतोय. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

 

नागरिकांमध्ये भीती –या अज्ञात विषाणूमुळे बोंडगाव, कालवड, हिंगणा या तिन्ही गावातील शेकडो नागरिकांची केस गेली आहेत. धक्कादायक म्हणजे, यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय आहे. मात्र एवढ्या भयंकर प्रकार होऊनही आरोग्य विभाग अनभिन्न आहे, त्यामुळे नागरिक खासगीत उपचार घेत आहेत.

 

शाम्पू वापरल्यामुळे असा प्रकार घडत असावा असे काही डॉक्टरांचे मत आहे. पण कधीही आयुष्यात शाम्पू न वापरणाऱ्या नागरिकांचेही केस जात असल्याने नागरिकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. बुलढाणा जिल्हा आरोग्य अधिकारी यांना शेगाव तालुका शिवसेनाप्रमुख रामेश्वर थारकर यांनी निवेदन देऊन या गंभीर बाबीची दखल घेऊन त्वरित सदर गावांमध्ये उपचार शिबिरे राबवण्याचे आवाहन केले आहे. या गावामधे आरोग्य विभागाने कोणतीही ठोस उपाय योजना केली नव्हती. कालवड, बोंडगाव व हिंगणा या गावामधे केस गळतीची समस्या नागरिकांना जाणवत असून आपोआप टक्कल पडत आहे. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ गीते यांना निवेदन दिले आहे. आता सरकारकडून काय पावले उचलली जातात, याकडे नागरीक डोळे लावून बसले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page