Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)

सन्मान पञकारितेचा:संपादक अन्सार शेख ‘महेश रत्न’पुरस्काराने सन्मानित

मेहकर येथे महेश परिवारातर्फे 'महेश रत्न' पुरस्काराचे वितरण

Spread the love

मेहकर (आपलं बुलढाणा जिल्हा बातमी):- स्थानिक महेश विद्या मंदिर येथे सोमवार, ६ जानेवारी रोजी बाळ शास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पत्रकार दिनानिमित्त महेश परिवाराने पत्रकारांचा सत्कार करून त्यांना सदिच्छा भेट दिली.संपादक अन्सार शेख यांना ‘महेश रत्न’ पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मिनित करण्यात आले. या कार्यक्रमात इतर पत्रकारांचाही सत्कार करण्यात आला व शुभेच्छा भेट देण्यात आल्या.

सर्वप्रथम माता सरस्वती महेश यांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात महेश परिवाराचे अध्यक्ष डॉ. सुभाष लोहिया, प्रमुख पाहुणे उदय सोनी, ठोकळ महाराज, यांच्या हस्ते करण्यात आली.रवींद्र वाघ,गणेश राऊत उपस्थित होते.या वेळी मान्यवरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, पत्रकारांनी समाजाप्रती समर्पित जाणीव कशी तरी पत्रकारिता करत असताना संकटांना सामोरे जावे लागते आणि सेवेची भावना जपली पाहिजे. सर्वसामान्यांना ओळख आणि आवाज देण्याचे काम पत्रकार आपल्या लेखणीच्या माध्यमातून करीत असतात. या वेळी या कार्यक्रमास मराठी पत्रकार परिषदेचे मार्गदर्शक तालुकाध्यक्ष दत्ता उमाळे, जिल्हा निसार अन्सारी, सहकार्याध्यक्ष नारायण पचेरवाल,सचिव संतोष सारडा, उपाध्यक्ष मुन्ना काळे, अन्सारोद्दीन शहनाजोद्दीन,अय्युब पठाण कोषाध्यक्ष अविनाश लाड, शहराध्यक्ष सादिक कुरेशी,शेख आलीम,सुनिल मोरे,अशोक शेजूळ,रविंद्र वाघ,सैय्यद हारुण, संतोष जाधव,संतोष सारडा,विशाल फितवे एजाज खान,प्रताप चव्हाण,गजानन दुतोंडे, गजानन सरकटे, उपस्थित होते.

 

निर्भीड पञकारीतेचा हा खरा सन्मान

अल्पावधीतच बातमीदारामध्ये ऊच्चांक गाठलेल्या निर्भीड आणी निपक्ष दैनिकाची ओळख असलेल्या दै.विदर्भ जगत चे संपादक अन्सार शेख यांच्या पञकारीतेचा गौरव म्हणून मोठ्या थाटामाटात साजरा झालेल्या कार्यक्रमामध्ये ‘महेश रत्न’ पुरस्काराने सन्मान केल्यामुळे ही खर्‍या पञकारितेची दखल असे विविध क्षेञातील मान्यवरांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.संपादक अन्सार शेख यांना पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page