आ. संजूभाऊ गायकवाड यांच्याकडून पत्रकारांना विम्याचे “कवच कुंडल”
सुमारे 10 लाखांचा विमा उतरवणार उद्याच्या मेगा कॅम्पमध्ये सहभागी होण्याचे बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे आवाहन

बुलढाणा :आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- समाजाचे आरोग्य सांभाळणारा पत्रकार हा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतो. समाज हिताची काळजी घेणाऱ्या पत्रकाराची काळजी घेतली जावी, त्याला जीवन सुरक्षा प्रदान व्हावी, या उदात्त हेतूने बुलढाण्याचे लोकप्रिय आमदार संजूभाऊ गायकवाड यांनी पत्रकारांना विमा संरक्षण देण्याचा स्वागतार्ह निर्णय घेतला आहे. उद्या, शुक्रवार, 10 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता बुलढाणा जिल्हा पत्रकार भवन या ठिकाणी आयोजित विम्याच्या मेगा कॅम्पमध्ये पत्रकारांनी सहभागी व्हावे असे आवाहन बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाकडून करण्यात आले आहे.
मराठी पत्रकार परिषद संलग्नित बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाकडून 06 जानेवारी मराठी पत्रकार दिनी पत्रकारांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 50 पेक्षा अधिक पत्रकारांनी सहकुटुंब आरोग्य तपासणी करीत शिबिराचा लाभ घेतला होता. त्याचवेळी पत्रकारांना विम्याची संरक्षण असावे, असा एक सूर पत्रकारांमधून उमटला होता. पत्रकारांच्या या आवाहनाला बुलढाण्याचे लोकप्रिय आमदार संजू भाऊ गायकवाड यांनी पहिला प्रतिसाद देत पत्रकाराला विमा संरक्षणाची हमी दिली आहे. बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाची विनंती मान्य करीत आ. गायकवाड यांनी भारतीय डाक विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या 10 लाख रुपयांच्या अपघाती विम्याची पत्रकारांसाठी तरतूद केली आहे. तरी पत्रकार बांधवांनी उद्या 10 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता बुलढाणा जिल्हा पत्रकार भवन या ठिकाणी उपस्थित राहून आमदार गायकवाड यांच्यातर्फे काढल्या जाणाऱ्या या विमा संरक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाने केले आहे. अधिक माहितीसाठी 9850377344, 9890936322, 9422266345, 9922359674 यापैकी कुठल्याही क्रमांकावर संपर्क करता येईल.
विमा संरक्षणासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
◾आधार कार्ड,आणि ईमेल आयडी हे असणार आहेत.