अखेर उपजिल्हा रुग्णालयातील शवगृह (पी.एम) फ्रिझरची ॲड रावळ यांनी स्वखर्चाने केली दुरुस्ती

मलकापूर:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:-रविंद्र गव्हाळे :- उपजिल्हा रुग्णालयातील शवगृहातील (पी.एम हाऊस) मधील फ्रिझर गेल्या महिनाभरापासुन नादुरुस्त असुन ते तात्काळ दुरुस्त करा अन्यथा फ्रीझरची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्याचा इशारा शिवसेना (उ.बा.ठा)शहरप्रमुख गजानन ठोसर यांनी दिला होता. तर लोकनेते ॲड हरीश रावळ यांनी रुग्णालय अधिक्षक राजेंद्र उंबरकर यांची फ्रिझर दुरुस्तीबाबत कान उघाडणी केली होती मात्र उंबरकर यांनी कागदी घोडे नाचवत वंरीष्ठांशी पत्रव्यवहार केला असुन सदर फ्रिझर दुरुस्ती साठी कंपनी चा कर्मचारी येणार असून त्यासाठी एक लाख रुपये खर्च येईल असे सांगितले.
मलकापूर शहर हे नॅशनल हायवे क्रमांक 53 व रेल्वे मार्गावर असल्याने अनेकदा अपघात घडून मृतकाची ओळख ही पटणे शक्य नसल्याने सदर मृतदेह फ्रिझरमध्ये दोन -दोन तीन -तीन दिवस ठेवावे लागत असल्याने व शवगृहातील फ्रिझर बंद असल्याने शवपेटी बाहेरून आणून पी.एम हाऊस मध्ये ठेवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते मात्र लाखो रुपये दुरुस्तीसाठी लागत असल्याचा बहाणा करून शासनाकडून पैसे उकळण्याचा रुग्णालय अधीक्षकाचा एक प्रकारे गोरख धंदाच झाला की काय अशी चर्चा आता शहरात रंगू लागली आहे … फ्रिझर दुरुस्तीसाठी लोकनेते ॲड हरीश रावळ व शिवसेना शहरप्रमुख गजानन ठोसर यांनी शहरातील खाजगी व्यक्ती आणून अवघ्या साडेतीन हजार रुपयांत फ्रिझर सुव्यवस्थित केला यावेळी लोकनेते ॲड हरीश रावळ, शिवसेना(उ.बा.ठा) शहरप्रमुख गजानन ठोसर, नगरसेवक अनिल गांधी, युवा नेते आदित्य रावळ सह आदिंची उपस्थिती होती.