केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांनी निर्देशित केलेले चेन्नई आणि दिल्लीचे पथक ही जिल्हयात दाखल…!
आयुर्वेद, होमीओपॅथी, युनानी आणि ॲलोपॅथी या चारही शाखेचे शास्त्रज्ञ लागले केस गळती आजाराचे मुळ शोधण्यासाठी…!

बुलडाणा ( आपलं बुलढाणा जिल्हा बातमी ):-केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केस गळती व टक्कल आजारावर संशोधन करण्याच्या दृष्टीकोनातुन आयुर्वेद, होमीओपॅथी, युनानी आणि ॲलोपॅथी या चारही शाखेचे शास्त्रज्ञ जिल्हयामध्ये दाखल झाले असुन हे सर्व तज्ञ टक्कल ग्रस्त गावातील रुगणांशी हितगुज करुन माहिती संकलीत करण्याचे काम करत आहे.यामध्ये भारतीय वैद्यकिय संशोधन परिषद अर्थात ICMR च्या दिल्ली आणि चेन्नई येथिल शास्त्रज्ञांचा समावेश आहे.
बुलढाणा जिल्हयातील शेगांव तालुका अंतर्गत येणाऱ्या पहुरजिरा, कालवड, कठोरा, भोनगांव, बोंडगांव यांसह 11 गांवामध्ये नागरीकांचे केस गळती होऊन टक्कल पडत असल्याची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे या गावातील नागरिक भयभित झाले होते दरम्यान केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या कार्यालयाच्या वतीने आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आली होती तर 11 जानेवारी रोजी केंद्रीय आयुष आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी या गावांना भेट देऊन बाधीत रुग्णांना धीर देत या विचित्र आजाराच्या संशोधनासाठी दिल्ली आणि चेन्नई येथिल ICMR आणि भारतीय वैद्यकिय संशोधन परिषदेची टिमला आदेशीत केले होते. त्यानुसार आज 14 जानेवारीला भारतीय वैद्यकिय संशोधन परिषद अर्थात ICMR दिल्ली आणि चेन्नई चे पथक जिल्हयातील शेगांव येथे दाखल झाले. या शास्त्रज्ञांच्या टिम मधील तज्ञांनी बुलढाणा जिल्हयातील वैद्यकीय आरोग्य अधिका-यां सोबत प्राथमिक चर्चा केली. त्यानंतर या पथकामधील शास्त्रज्ञ केस गळती भागातील बाधीत रुग्णांशी संवाद साधुन हा प्रकार कशामुळे झाला. त्याच मुळ शोधुन प्रादुर्भाव रोखण्याचे दृष्टीने काम करणार आहे. या विशेष पथकामध्ये डॉ.मनोज मुऱ्हेकर (ICMR-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी, चेन्नई) , डॉ. सोमेश गुप्ता (एम्स, नवी दिल्ली), डॉ सुमित अग्रवाल (ICMR, नवी दिल्ली), डॉ. शीला गोडबोले (ICMR-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सलेशनल व्हायरोलॉजी, पुणे) ,डॉ राज तिवारी (ICMR-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन एन्व्हायर्नमेंटल हेल्थ, भोपाळ) , डॉ सुचित कांबळे (ICMR-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सलेशनल व्हायरोलॉजी, पुणे) यांचा या विशेष पथकामध्ये यांचा समावेश आहे. तर 13 जानेवारीला आयुष मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या प्रादेशिक होमीओपॅथी संशोधन संस्था नवि दिल्ली आणि केंद्रिय होमीओ परिषदेची शास्त्रज्ञाची टिम शेगांव तालुक्यात दाखल झाली आहे. यामध्ये युनानी होमीओपॅथी आणि आयुर्वेदीकचे तज्ञांचा समावेश असुन डॉ.हिंकल कौर, डॉ.प्रियंका सुर्यवंशी, डॉ.तेजस्वीनी पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली केस गळती गावातील रुग्णांशी चर्चा करुन माहिती संकलीत करण्याचे काम करीत आहे. आयुर्वेद, होमीओपॅथी, युनानी आणि ॲलोपॅथीचे शास्त्रज्ञ केसगळती प्रकारणच्या मुळाशी जाऊन हा प्रकार कशामुळे झाला हे शोधण्याचे काम करीत आहे.