पत्रकार गणेश निकम यांची प्रदेश प्रतिनिधी म्हणून निवड…
बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचा वैचारिक विस्तारही सुरु

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- प्रख्यात साहित्यीक, विचारवंत तसेच दै. अजिंक्य भारतचे जिल्हा प्रतिनिधी गणेश निकम यांची बुलढाणा जिल्हा पत्रकार संघातर्फे मराठी पत्रकार परिषदेचे प्रदेश प्रतिनिधी म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेशी संलग्नित बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचा मागील दहा दिवसांपासून सर्व स्तरावर विस्तार सुरु आहे. नवीन कार्यकारिणीने पहिल्या दिवसापासून विविध उपक्रम राबविण्यासोबतच पत्रकारिता समृद्ध करणारे आणि समाजाला दिशा देणारे कार्यक्रम आयोजित केले आहे. त्यामुळेच बुलढाणा जिल्हा पत्रकार संघासोबत दररोज अनेक चांगले पत्रकार जुळत आहेत. आज, बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची बैठक जिल्हाध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली. दोन प्रदेश प्रतिनिधी संघातर्फे निवडले जातात. यापूर्वी निवडले गेलेले प्रदेश प्रतिनिधी युवराज वाघ यांनी दुसऱ्या प्रतिनिधी पदासाठी गणेश निकम यांचे नाव सुचविले. या नांवावर संपूर्ण कार्यकारिणीने एकमताने शिक्कामोर्तब केले. सन 1988 पासून श्री निकम पत्रकारितेत आहेत. ग्रामिण पत्रकारितेपासून सुरुवात केलेल्या गणेश निकम यांनी अल्पावधीतच राज्यस्तरीय पत्रकारितेपर्यंत झेप घेतली. त्यांना आतापर्यंत विविध सामाजिक आणि पत्रकारितेला समर्पीत पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. गणेश निकम यांच्या रूपाने बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या प्रतिष्ठेत वैचारिक भर पडली असल्याचे मत जिल्हाध्यक्ष श्री राजपूत यांनी व्यक्त केले आहे. प्रदेश प्रतिनिधी पदी निवड झाल्याबद्दल श्री निकम यांचा कार्यकारिणीच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रदेश प्रतिनिधी युवराज वाघ,सरचिटणीस कासिम शेख, महिला जिल्हाध्यक्ष कु. मृणाल सावळे,कार्याध्यक्ष वसीम शेख अन्वर, उपाध्यक्ष रविंद्र गणेशे, तथा विभागीय संघटक रहमत अली आणि यांनी श्री निकम यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाची उर्वरित कार्यकारिणी , 15 जानेवारी रोजी दुपारपर्यंत घोषित करण्यात येणार आहे, हे विशेष.