लोकमंच बुलढाणा द्वारा अभिवादन सोहळा..
जिजाऊं ह्या विचारांचे 'ज्ञानपीठ ' होत - सुनील सपकाळ

बुलढाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:-छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकशाहीवादी राजकारण केले. या पाठीमागे जिजाऊ साहेब यांची प्रेरणा होती. जिजाऊ सारखी माता पाठीशी असेल तर शिवबा सारखा नैतिक राजा तयार होतो, हा परिपाठ इतिहासाने दिला. जिजाऊंनी समतेचा विचार शिवबांच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरविला. जिजाऊ ह्या ज्ञानपीठ, विचारपीठ व संस्काराचा आदर्श असल्याचे प्रतिपादन लोकमंच कार्याध्यक्ष सुनील सपकाळ यांनी केले.
लोकमंच बुलढाणा द्वारा राजमाता जिजाऊ मा साहेबांना चिंचोले हॉस्पिटल या ठिकाणी आज अभिवादन करण्यात आले. यावेळी सुनील सपकाळ बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी लोकमंच बुलढाणाचे अध्यक्ष डॉक्टर शोन चिंचोले होते. तर एडवोकेट जयसिंग राजे देशमुख, पत्रकार गणेश निकम, डॉ.पुरुषोत्तम देवकर ,अण्णासाहेब म्हळसने, सुनील जवंजाळ, सुरेश साबळे, गौरव देशमुख,प्राध्यापक ज्योती पाटील, बबन नाना, दामोदर बिडवे, डॉक्टर किनगे ,शैलेश खेडकर
आदींची उपस्थिती होती.
सर्वप्रथम मान्यवरांनी जिजाऊ पूजन केले. डॉक्टर शोणं चिंचोले यांनी भूमिका मांडली. बुलढाणा जिल्ह्याला जिजाऊ मुळेच ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाल्याचे डॉक्टर शोंन चिंचोले म्हणाले. एडवोकेट जयसिंग राजे, दामोदर बिडवे, डॉक्टर देवकर यांनीही प्रसंगी जिजाऊ यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. संचलन व आभार पत्रकार गणेश निकम यांनी केले.