शरद पवार उर्दू हाईस्कूल & जुनियर कॉलेज चांडोळ विध्यार्थीने उभारला व्यपार मेळावा…

धाड:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:-बुलढाणा जिल्ह्यातील चांडोळ येथे शरद पवार उर्दू हाईस्कूल &जुनिअर कॉलेज येथे बुधवारी बाळ आनंद मेळावा आयोजित करण्यात आले होते.
यावेळी विध्यार्थीनी या मेळाव्यात स्टॉल लाऊन स्व. परिषमाने बनविलेल्या विविध साहित्याची विक्री करून भरपूर पैशाची कमाई केली आहे.तसेच या मेळाव्यात आपापल्या स्टॉल ची सजावट करत व बोर्ड लाऊन येणाऱ्या गावाकऱ्यांचे व येणाऱ्या प्रमुख पाहुण्यांचे लक्ष वेदले आहे.या वेळी विध्यार्थीने पाणी पुरी, मुंग वडा, पान शाप, चिकन बिर्याणी, लस्सी, बदाम शेक,व विविध खान पान चे दुकान लावले होते.या मेळाव्यात गावचे प्रथम नागरिक सरपंच सुनील महेर, शिवाजी देशमुख, कलीम अत्तार, इब्राहिम भाई, नसरूला पठाण, यांनी चार चांद लावले.त्यानंतर धाड पोलीस स्टेशन चे API श्री. चेचरे साहेब PSI चौहान साहेब , केंद्र साहेब,पोलीस पाटील पंकज देशमुख यांनी ही उपस्तीथी दर्शवली.
या मेळाव्याचा चांडोळ येथील माँ जिजाऊ, जिल्हा परिषद उर्दू स्कूल, मौलाना आजाद धाड येथील विध्यार्थीनीही हजेरी लावली यावेळी मौलाना आजाद एज्युकेशन &वेल्फर सोसायटी संस्थाचे सेकेटरी हाजी इकबाल सॊदागर साहब यांच्या हस्ते उठघाटन करण्यात आलं .या मेळाव्याला गावातील तरुण मंडळी व पालकानी ही भरपूर सात दिली.या आनंद मेळाव्याला शरद पवारहाईस्कूल & जुनिअर कॉलेज चे सर्व शिक्षकानी विध्यार्थीचे मनोबल वाडवले. त्यात मुख्याध्यापक श्री सय्यद समीर सर प्राचार्य श्री सय्यद नदीम सर,श्री, जमील सर, वहाब सर, नावेद सर, रहीम सर, अहाद सर, नतिक सर शबाना मैडम, रुहीना मैडम, नाजिया मैडम, शहेजाद सर, नदीम सर जुनिअर, यांचा समावेश होता.